मंदौस चक्रीवादळ राज्यभरातून गेल्यानंतर आठवड्याभरानंतर आता कमाल तापमान खाली सरकू लागले आहे. रविवारी नाताळच्यादिवशी राज्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंशापर्यंत नोंदवल्याचे वेधशाळेच्या नोंदणीतून दिसून आले. कोकणात अलिबाग येथे कमाल तापमान २६.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान खाली घसरल्याची नोंद मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने केली.
किमान तापमान गेल्या चार दिवसांपासून सातत्याने खाली सरकत राज्यातील बहुतांश भागांत आता २० अंश सेल्सिअसवर आले आहे. रविवारी किमान तापमानातही मोठी घसरण दिसून आली. सांताक्रूझ येथे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस तर महानगर भागांत किमान तापमान दहा अंशाच्याही खाली गेल्याची नोंद झाली. हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांच्या नोंदणीत बदलापूरात ९.१ तर तलासरी येथे ९ अंश सेल्सिअसवर किमान तापमान नोंदवले गेले. उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १७ अंशापर्यंत नोंदवले जात आहे.
(हेही वाचा :कोरोनाला घाबरुन लॉकडाऊन नकोच…आयसीएमआरच्या तज्ज्ञांचे मत )
कमाल तापमानाच्या नोंदी –
- महाबळेश्वर – ३०.७ अंश सेल्सिअस
- हर्णे – २८.३ अंश सेल्सिअस
- कुलाबा – २८.५ अंश सेल्सिअस
- डहाणू – २८.९ अंश सेल्सिअस
- सांताक्रूझ – २९ अंश सेल्सिअस
- माथेरान – २९.६ अंश सेल्सिअस
- ठाणे – ३० अंश सेल्सिअस
किमान तापमान -तलासरी – ९ अंश सेल्सिअस
- बदलापूर – ९.१ अंश सेल्सिअस
- कर्जत – ९.५ अंश सेल्सिअस
- औरंगाबाद – १०.८ अंश सेल्सिअस
- जळगाव – १०.७ अंश सेल्सिअस
- ठाणे- १४ अंश सेल्सिअस