तीन दिवसांनी महापौरांना आठवण झाली वरळीतील जखमींची

108

वरळीमधील सिलिंडर स्फोटाची घटना मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता घडल्यांनतर संबंधित जखमींना वेळेवर उपचार मिळाला नाही आणि त्यातच चार महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर दोन दिवसांमध्ये महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरांसह आरोग्य समिती अध्यक्षही नायर किंवा कस्तुरबा रुग्णालयामध्ये फिरकले नाहीत. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांची दिरंगाई समोर आल्यानंतर तसेच भाजपने याप्रकरणी जोरदार आंदोलने करून शिवसेनेच्या विरोधात रान उठवल्यानंतर अखेर महापौर किशोरी पेडणेकर यांनी  गुरुवारी दुपारी नायर रुग्णालयात जावून अधिष्ठातांकडून रुग्णाच्या प्रकृती जाणून घेतली.

आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ तरीही दिरंगाई

विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदार संघ असून त्यांच्या विभागातील विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तत्परता दाखवणारे महापौर या विभागातील दुघर्टनेतील रुग्णांची साधी विचारपूस करायला तीन दिवस लावतात. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरळीमधील सिलिंडर स्फोटात भाजलेल्या रुग्णांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी, ०२ डिसेंबर २०२१ रोजी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, तसेच संबंधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर व परिचारका यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी नायर रुग्णालय प्रशासनाला दिले आहे. याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, संचालक (प्रमुख रूग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत पवार उपस्थित होते.

(हेही वाचा ओमिक्रॉनची दहशत : मुंबईच्या विमानतळावरच नाकाबंदी)

महापालिका रुग्णालयाचे वाभाडे काढले

मात्र, शिवसेना आमदार आणि शिवसेना नगरसेवकांच्या मतदार संघातील रुग्णांवरील उपचारात दिरंगाई केल्याप्रकरणी कारवाईचे निर्देश महापौरांना तीन दिवसांची वाट पहावी लागली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय उपचार पध्दतीचे वाभाडे काढले होते. त्यानंतर बुधवारी यातील चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षालाच टार्गेट केले होते. एवढेच नाही तर गुरुवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार योगेश सागर, अमित साटम,  महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांच्या सह आरोग्य समितीच्या सदस्यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची भेट घेतली. परंतु या सर्व हालचालीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा रूग्णालयाला भेट देत रुग्णाच्या माहिती जाणून घेतली.b

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.