-
ऋजुता लुकतुके
नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे बँकांच्या कामाच्या दिवसांवर परिणाम होणार आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद असतील. (Bank Holidays in November 2023)
नोव्हेंबर महिना हा ३० दिवसांचा आहे आणि त्यातच या महिन्यात साधारणपणे १५ दिवस बँकांना सुटी असेल. रिझर्व्ह बँकेनं नोव्हेंबर महिन्यासाठी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. दिवाळी देशभरात साजरी होत असल्यामुळे या महिन्यात कामकाजाचे दिवस कमीच असणार आहेत. त्यामुळे बँकेची कामं करताना ग्राहकांना वेळेचं नियोजन करावं लागणार आहे. (Bank Holidays in November 2023)
नेहमीच्या दुसरा आणि चौथा शनिवार तसंच चारही रविवार या सुट्या वगळता आणखी ९ सुट्या या महिन्यात येत आहेत. यातल्या काही या प्रादेशिक म्हणजे त्या त्या भागापुरत्या मर्यादित आहेत. (Bank Holidays in November 2023)
बँकांना १५ दिवस सुट्या असल्या तरी डिजिटल सेवा जसं की, युपीआय, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग या सुरूच राहतील. (Bank Holidays in November 2023)
(हेही वाचा – Assembly Elections : काँग्रेस-भाजपला लहान पक्षांचे आव्हान)
पाहूया नोव्हेंबर महिन्यातील सुट्या
१ नोव्हेंबर (बुधवार) – कन्नडा राज्योत्सव/करवा चौथ (कर्नाटक, मणीपूर, हिमाचलप्रदेश)
५ नोव्हेंबर (रविवार) – रविवार
१० नोव्हेंबर (शुक्रवार) – वांगला सण (मेघालय)
१२ नोव्हेंबर (रविवार) – रविवार व दिवाळीचा पहिला दिवस
१३ नोव्हेंबर (सोमवार) – लक्ष्मीपूजन, दीपावली (त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्किम, महाराष्ट्र, मणीपूर, राजस्थान व उत्तर प्रदेश)
१४ नोव्हेंबर (मंगळवार) – दीपावली (गुजरात, महाराष्ट्र, सिक्किम व कर्नाटक)
१५ नोव्हेंबर (बुधवार) – भाऊबीज, दीपावली (सिक्किम, मणीपूर, उत्तर प्रदेश, प बंगाल व हिमाचल प्रदेश)
१९ नोव्हेंबर – रविवार
२० नोव्हेंबर (सोमवार) – छठपूजा (बिहार व राजस्थान)
२३ नोव्हेंबर (गुरुवार) – इगास, बागवाल (उत्तराखंड व सिक्किम)
२५ नोव्हेंबर – चौथा शनिवार
२७ नोव्हेंबर (सोमवार) – गुरु नानक जयंती (त्रिपुरा, मिझोरम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिशा, चंदिगड, उत्तराखंड, हैद्राबाद, तेलंगाणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, पं बंगाल, नवी दिल्ली, बिहार, झारखंड व हिमाचल प्रदेश)
२६ नोव्हेंबर – रविवार
३० नोव्हेंबर (सोमवार) – कनकदास जयंती (कर्नाटक) (Bank Holidays in November 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community