ओमायक्रॉन विषाणूमुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु असताना यंदाच्या आठवड्यापासून मृत्यूदराच्या टक्क्यात घट दिसून येत आहे. राज्यात नव्या कोरोना रुग्णांची वाढ होत असताना मृत्यूदर दोन टक्क्यांच्या खाली नोंदवला जात आहे. शुक्रवारपासून मृत्यूदराची टक्केवारी घसरल्याची नोंद आहे. गेले आठवडाभर दर दिवसाला वीसपेक्षाही अधिक रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला दोन टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यूदर नोंदवला जात होता. शुक्रवारपासून मृत्यूदराचा टक्का दोनपेक्षाही खाली उतरला. शुक्रवारी मृत्यूदर १.९८ टक्के तर शनिवारी मृत्यूदराची टक्केवारी, १.९७ टक्के दिसून आली.
घरात विलगीकरणावर भर
शनिवारपर्यंत राज्यातील विविध भागांत २२ लाख १०८ जणांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले. तर संस्थात्मक विलगीकरणात ६ हजार १०२ जण होते. दर दिवसाला एक ते दोन लाख जणांना राज्यातील विविध भागांत घरी विलगीकरणात ठेवले जात आहे.
( हेही वाचा : एका दिवसात नागपुरात सापडले ओमायक्रॉनचे ३९ रुग्ण )
राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाख पार
सध्याच्या घडीला राज्यात २ लाख ६४ हजार ४४१ सक्रीय कोरोनाचे रुग्ण आहेत. शनिवारी ३९ हजार ६४६ रुग्ण कोरोना उपचारातून बरे होऊन घरी परतले. शनिवारपर्यंत राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७१ लाख ७० हजार ४८३ वर पोहोचली. आतापर्यंत राज्यात ६७ लाख ६० हजार ५१४ रुग्ण कोरोना उपचारातून बरे झाले आहेत.
Join Our WhatsApp Community