नायर रुग्णालयातील शवागाराचे नुतनीकरण केले जात असून या शवागाराची क्षमता कमी असल्याने आता याची क्षमता वाढवण्यात येत आहे. या शवागाराची क्षमता ३२ एवढी आहे. त्यामुळे यातील शवांची क्षमता वाढवून ती एकूण ५१ एवढी केली जाणार आहे.
महापालिकेच्या बा.य.ल. नायर रुग्णालय येथील शवागारातील वातानुकूलित यंत्रणा खराब झालेली असून संपूर्ण शवागार यंत्रणाच खराब झाल्याने शवागाराच्या जागेचे नुतनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या शवागारात शव ठेवण्यासाठी दोन शवागार कक्ष आहे. त्यातील एकाची क्षमता २४ शव आणि दुसऱ्याची क्षमता ८ शव अशाप्रकारे एकूण ३२ शव ठेवण्याची क्षमता आहे. परंतु सततच्या वापरामुळे संपूर्ण शवागार यंत्रणाच खराब झालेली आहे. त्यामुळे ही शवागार यंत्रणाच त्वरीत बदलण्याची गरज असल्याने महापालिकेने या शवागाराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा –BMC : नवजात बाळ रडते म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली; महापालिकेच्या प्रसूतिगृहातील धक्कादायक प्रकार )
सद्यस्थितीत असलेल्या ३२ शवाची क्षमता वाढवून ती ५१ शव ठेवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या शवागारात मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा बसून ही यंत्रणा २००९मध्ये बसवली होती. त्यामुळे ही यंत्रे बसवून १४ वर्षे उलटली असून याचे आर्युमान संपल्याने ते बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी साई कुल सर्व्हिसेसची निवड करण्यात आली आहे. याकरता ५.१२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community