मागच्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर संप करत आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम असल्याने आता एसटी महामंडळाने पर्यायी मार्ग शोधला आहे. कंत्राटी स्वरुपातील चालकांनंतर आता कंत्राटी वाहकांचा आधार घेतला जाणार आहे. एसटी गाड्यांमध्ये इलेक्ट्राॅनिक तिकीट यंत्र पुरवण्याचे कंत्राट ट्रायमॅक्स कंपनीला दिले आहे.
तिकीट आता थांब्यावर
एसटीचे संपकरी कर्मचारी नोकरीवर हजर राहण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. ही सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी कंत्राटी स्वरुपात चालक उपलब्ध केले होते. सध्या कंत्राटी चालकांसह कामावर हजर झालेल्या वाहकांमार्फत बस धावत आहेत. ट्रायमॅक्स या कंपनीकडून 54 वाहक देण्यात आले आहेत. सध्या या वाहकांचे प्रशिक्षण सुरु आहे. या कंत्राटी वाहकांची नियुक्ती थांब्यावरच केली जाणार आहे. त्यामुळे थांब्यावरच तिकीट उपलब्ध होणार आहे.
( हेही वाचा: रशिया – युक्रेन युद्धात अमेरिका उतरणार नाही! जो बायडेन भाषणात काय म्हणाले? )
म्हणून हा पर्यायी मार्ग
महामंडळाला संपामुळे दोन हजार कोटींच्या घरात तोटा झाला आहे. काही प्रमाणात एसटीची सेवा सुरु आहे. पण उत्पन्नात मात्र फार भर पडली नसल्याचे, प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 92 हजार कर्मचा-यांपैकी मोजकेच कर्माचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवर 11 मार्चला सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community