BMC : व्हॉट्सअप चॅटबॉटवरील संदेशासाठी महापालिका मोजणार प्रत्येकी ३७ पैसे

मुंबई महापालिकेच्या ८० पेक्षा अधिक सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेल्या व्हॉट्स अप चॅट बॉटचे करार संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने संस्थेची नेमणूक केली आहे. मात्र, यापूर्वी ज्या संस्थेकडे ही सेवा होती, त्याच संस्थेला पुन्हा काम मिळाले असून या महापालिकेकडून पाठवण्यात येणाऱ्या व्हॉट्सअप संदेशासाठी ३७ पैसे आणि  नागरिकांकडून आल्यास त्यासाठी ३४ पैसे एवढे शुल्क दिले जाणार आहे.

2671
BMC : व्हॉट्सअप चॅटबॉटवरील संदेशासाठी महापालिका मोजणार प्रत्येकी ३७ पैसे
BMC : व्हॉट्सअप चॅटबॉटवरील संदेशासाठी महापालिका मोजणार प्रत्येकी ३७ पैसे
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेच्या ८० पेक्षा अधिक सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेल्या व्हॉट्सअप चॅट बॉटचे करार संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने संस्थेची नेमणूक केली आहे. मात्र, यापूर्वी ज्या संस्थेकडे ही सेवा होती, त्याच संस्थेला पुन्हा काम मिळाले असून या महापालिकेकडून पाठवण्यात येणाऱ्या व्हॉट्सअप संदेशासाठी ३७ पैसे आणि नागरिकांकडून आल्यास त्यासाठी ३४ पैसे एवढे शुल्क दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी या व्हॉट्सअप चॅटबॉटसाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपये मोजले जाणार आहेत. (BMC)

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले होते लोकार्पण

व्हॉट्सअप चॅटबॉट सुविधाद्वारे नागरिकांना तब्बल ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. सन २०२२मध्ये मकरसंक्रातीच्या दिवशी या व्हॉटसअप चॅटबॉट सुविधेचे लोकार्पण तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. महापालिकेत माय बीएमसी असिस्ट व्हॉट्सअप चॅटबॉट सुरु झाल्यापासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता महापालिकेने इन्फोबिफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मार्च २०२२ मध्ये कंत्राट दिले होते. हा कंत्राट कालावधी संपुष्टात आला असून या निविदेमध्ये इन्फोबिफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुन्हा एकदा पात्र ठरली आहे. (BMC)

यासाठी मोजणार दुप्पट पैसे

विशेष म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून आधीपासूनच व्हॉट्सअप चॅटबॉटची सेवा सुविधा महापालिकेच्यावतीने पुरवली जाते. त्यामुळे यासाठीची सर्व यंत्रणा कार्यान्वित असताना या कंपनीला व्हॉट्सअप चॅटबॉट सोल्युशन्ससह संपूर्ण ओम्री चॅनेलचे डिझाईन व विकास करून त्याची अंमलबाजवणी करण्यासाठी सुमारे ३० लाख रुपये मोजले जाणार आहे. या कामासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने एक रकमी १५ लाख रुपये एवढा दर निश्चित केला होता, त्यातुलनेत कंत्राटदार संस्थेने, जी यापूवीपासून सेवा देत आहे, त्याने दुप्पट म्हणजे सुमारे ३० लाख रुपये एवढा दर आकारला आहे. (BMC)

Screenshot 20240107 183116

(हेही वाचा – Kelucharan Mohapatra : प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तक केलुचरण मोहापात्रा)

नागरिकांकडून येणाऱ्या संदेशासाठी मोजणार प्रत्येकी ३४ पैसे

तर प्रति व्हॉट्सअप मेसेजसाठी ३७ पैशांचे शुल्क आकारले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये साडेतीन कोटी व्हॉट्सअप मेसेज महापालिकेकडून पाठवणे अपेक्षित असल्याने त्यासाठी  एकूण  १ कोटी  ३० लाख रुपये एवढे शुल्क आकारले आहे, नागरिकांकडून येणाऱ्या प्रति मेसेजसाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या ३० पैशांच्या तुलनेत प्रति मेसेज करता ३४ पैसे एवढे शुल्क आकारले आहे. त्यामुळे एकूण अडीच कोटी मेसेज करता एकूण ८५ लाख रुपये त्यामुळे व्हॉट्सअप चॅटबॉट सोल्युशनसाठी तांत्रिक सहाय्य, मासिक देखभाल याकरता सुमारे ५८ लाख रुपये, आणि चेंज रिक्वेस्टसाठी सुमारे २१ लाख अशाप्रकारे एकूण तीन वर्षाकरता ३ कोटी २३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. (BMC)

कंत्राट संपण्यापूर्वी निविदा मागवूनही नऊ महिने वाढीव काम

मागील वेळेस मार्च २०२२मध्ये एक वर्षांकरता हे कंत्राट देण्यात आले होते आणि या एक वर्षांकरता याच कंपनीने विविध करांसह १ कोटी ६१लाख रुपये आकारले होते. मात्र, आता तीन वर्षांकरता ३ कोटी २३ लाख याप्रमाणे वर्षासाठी १ कोटी ०८ लाख रुपये एवढे आकारले आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत हा दर कमी असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे एक वर्षांचे कंत्राट मार्च २०२३मध्ये संपुष्टात येणार असल्याने महापालिकेने मार्च २०२३मध्ये निविदा मागवली. त्यामुळे एप्रिल २०२३मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात या निविदेत पात्र ठरलेल्या कंपनीला डिसेंबर महिन्यात मंजुरी देण्यात आली. त्यामुळे याच कंपनीला कंत्राट संपुष्टात आल्यानंतर ही सेवा कार्यरत ठेवण्यासाठी  ९ ते १० महिने वाढीव काम देण्यात आले. (BMC)

(हेही वाचा – Ashapurna Devi : लहानपणी मुलगी म्हणून शाळेत पाठवले नाही, पुढे ज्ञानपीठ आणि पद्म पुरस्कार विजेत्या ठरल्या आशापूर्णा देवी)

अशाप्रकारे व्हॉट्सअप चॅटबॉटचा लाभ घेऊ शकता
  • मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे.
  • ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste किंवा Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे २ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे ३ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधीत पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात. (BMC)
  • या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे. (BMC)
  • महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधीत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध. (BMC)
  • महानगरपालिकेशी संबंधीत विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी युपीआय आधारित ऑनलाईन सेवा उपलब्ध. (BMC)
  • या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नसून केवळ व्हॉट्सअपद्वारे ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर एक संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेता येत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.