अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील बेघरांसाठी गृहनिर्माण यासाठी आरक्षित भूखंडाचे संपादन महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. हा संपूर्ण भूखंड अतिक्रमित असून या भूखंडाची मालकी राज्य शासनाची आहे. त्यामुळे या भूखंडाचा विकास करण्याबाबतची कार्यवाही करण्याकरता राज्य शासनाशी पत्र व्यवहार सुरु असून राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यास त्या अनुषंगाने जमिन संपादनाची कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC)
अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील शहर सर्वे क्रमांक २११ (भाग) आणि बेघरांसाठी गृहनिर्माण याकरता आरक्षित असलेला भूभाग संपादनाची मागणी होत असून हा भूखंड सध्या वापरातील रस्त्यालगत आहे. हा भूखंड १२.२० मीटर रुंद आणि २७.४५ मीटर रुंद विकास नियोजन रस्त्याने बाधित असून हा संपूर्ण निवासी पट्ट्यात येत आहे. सार्वजनिक उद्दिष्टांकरता राखीव असलेला हा भूखंड संपूर्णपणे अतिक्रमित आहे. (BMC)
(हेही वाचा – राज्यपालनियुक्त 12 आमदारांमध्ये Ajit Pawar गट देणार एक मुसलमान आमदार)
गिल्बर्ट हिल परिसरातील दाट वस्तीतील झोपडपट्टी असून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाकरिता इमारतींचे बांधकाम करण्यासाठी गिल्बर्ट हिलमधील २११ (भाग) हा भूखंड सन २०१४-३४ या विकास आराखड्यात बेघरांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे हा भूखंड संपादित करणे आवश्यक असून या भूखंडावरील रहिवाशांना पुनर्वसनासाठी बांधलेल्या इमारतींमध्ये पुनर्वसन स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी होत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community