- सचिन धानजी, मुंबई
मुंबईत सध्या पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले असून या विकास कामांचे बांधकाम सुरु असलेल्या अनेक रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. हे सर्व बॅरिकेड्सवर थुंकल्यामुळे तसेच धुळीमुळे खराब झालेले आहेत. त्यामुळे रस्त्यालगत असलेले सर्वच बॅरिकेड्स पाण्याने धुण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली असून मेट्रो रेल्वेच्या कामांचे बॅरिकेड्सही महापालिकेतर्फे धुण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या प्रकल्प कामांचे बॅरिकेड्सची सफाई करून घेण्याऐवजी महापालिकेने स्वत:च हे बॅरिकेड्स पाण्याने धुवत असल्याने खासगी विकासकांनी उभारलेले बॅरिकेड्सपण धुणार का असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC)
मुंबईत विविध विकास प्रकल्प, पायाभूत विकास प्रकल्प आणि इमारतींचा पुनर्विकास प्रकल्पांच्या ठिकाणी विविध ठिकाणी देखभाली अभावी यातील बहुतेक बॅरिकेड्स रस्त्यांजवळील घाणेरडे झालेले आहेत. बॅरिकेड्सवर लोक थुंकले आहे आणि त्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात धूळ आणि घाण साचली आहे. याव्यतिरिक्त, बांधकामाच्या ठिकाणी बेवारस कचरा, तुटलेले पेव्हर ब्लॉक, खराब झालेले दुभाजक आणि विखुरलेले कचरा आढळून येत आहे. काही भागात, रस्त्यांवर खडबडीत वाळू आणि कचरा पसरला आहे, ज्यामुळे मोटारसायकली अपघात होतात. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीही झाली आहे, ज्यामुळे पादचाऱ्यांना, प्रवाशांना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुंबईतील रस्त्यांवरील, मुख्य रस्त्यांवरील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बांधकाम ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC)
(हेही वाचा – Dadar Hawkers : दादर पश्चिममध्ये तिसऱ्याच दिवशी कारवाई फसली; महापालिकाच करते जनतेची दिशाभूल)
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने शनिवार, १४ डिसेंबर २०२४ पासून सकाळी सात वाजल्यापासून ते रविवारी १५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दोन दिवसांमध्ये ही मोहिम पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये सर्व बॅरेकेट्स हे प्रेशर शेटने धुतले जाणार आहेत. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करून या बॅरिकेड्ससह धूळ, घाण आणि कचरा पूर्णपणे स्वच्छ करण्यात येत आहे. यासाठी कचरा गोळा करण्यासाठी आवश्यक असल्यास वेगळे डंपर भाड्याने घेतले गेले आहेत. धूळ, कचरा आणि पेव्हर ब्लॉक, तुटलेले डिव्हायडर आणि विटांचे ब्लॉक यासारख्या इतर साहित्याने भरलेले असे सर्व डंपर सी अँड डी कचरा प्रक्रिया केंद्पारात पाठवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. या उपक्रमादरम्यान धूळ उडू नये यासाठीमिस्टिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. (BMC)
खासगी विकास प्रकल्पांमध्ये मग ते गृहनिर्माण प्रकल्प असो वा अन्य, याठिकाणच्या बॅरिकेड्सची साफसफाईची जबाबदारी ही संबंधित संस्था तथा विकासकांची असताना महापालिकेने ही सफाई आपल्या अंगावर का घेते असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ज्या खासगी विकासकांनी बांधकामाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स आणि मेट्रोसह इतर प्रकल्पांच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स यांची सफाई संबंधित कंपनीकडून करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. परंतु तसे न करता याची जबाबदारी महापालिकेने धुळमुक्तीच्या नावावर आपल्या हाती घेतली. या धुळमुक्त अभियानांमध्ये यासर्वांना सहभागी करून घेण्याऐवजी महापालिकेने स्वतंत्रपणे ही मोहिम राबवून याचा खर्च स्वत:चा उचलल्याने याचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडला जाण्याची शक्यता आहे. (BMC)
- संध्याकाळपर्यंत जवळपास ७ किमी लांबीचे २०४७ बॅरिकेड्स स्वच्छ आणि धुतले.
- महापालिकेचे एकूण २०३१ कर्मचारी (१,३६२), स्वयंसेवी संस्था (६६९) आणि स्वयंसेवक सहभागी.
- या मोहिमेसाठी जेसीबी, डंपर, वॉटर टँकर, मेकॅनिकल स्वीपर, फायरएक्स मशीन इत्यादी १८५ मशीनचा वापर.
- घनकचरा व्यवस्थापन विभागाने एकूण ३८९ टन कचरा साफ केला.
- एकूण ३२३ टन कचरा साफ केला. (सी अँड डी प्रक्रिया संयंत्रांमधून संख्या पडताळली जाईल)
- एकूण ५२ टन गाळ आणि घनकचरा केला साफ.
- एकूण १४ टन बाग, झाडांचा पालापाचोळा आदींचा कचरा केला साफ.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community