पावसाचा जोर ओसरला

77
मंगळवारी रात्रीपर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने लोकलसेवा विस्कळीत केल्यानंतर, विश्रांती घेतली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत मुंबई आणि महानगर परिसरात हलका पाऊस राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.

ठाणे, नवी मुंबई परिसरात हलक्या सरी राहतील

मुंबईत साडेनऊनंतर पावसाचा जोर रात्रीच्या तुलनेत कमी होत चालला आहे. मुलुंड, सांताक्रूझ, चेंबूर, कुलाबा, वरळी परिसरात पुढील दोन तास मुसळधार पावसाची शक्यता नाही, तसेच संततधार पावसालाही दुपारी एक वाजेपर्यंत ब्रेक राहील. दरम्यान, रात्रीच्या पावसाचे मुंबईतील बहुतांश भागातील किमान तापमान 25 अंश सेल्सीयसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. सकाळी साडेआठ वाजता  महालक्ष्मी येथे किमान तापमान 26.1, विक्रोळीत 27.2, राम मंदिर येथे 26.5, वांद्रे येथे 26.2 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.