Ganeshotsav 2023 : श्री गणेश मूर्तींवर शिक्का मारण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट केली ‘ही’ भूमिका

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या ओळखीसाठी ‘मार्क’ करण्याचा विषय चर्चेला आला होता.

178
Public Ganeshotsav 2024 : मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा

यंदाच्या गणेशोत्सव सणासाठी प्रशासनामार्फत सुरुवातीलाच आयोजित विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या ओळखीसाठी ‘मार्क’ करण्याचा विषय चर्चेला आला होता. मात्र, याच बैठकीत गणेश मूर्तींवर शिक्का मारला जाऊ नये, अशा सूचना प्रशासनामार्फत मूर्तीकारांना त्यावेळीच देण्यात आल्या होत्या. मूर्तीकारांनीही या सुचनेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीत महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पर्यावरण पूरक आणि इतर मूर्ती यावर शिक्के मारले जात आहेत.

(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : यंदा गणेशोत्सव मंडळांना पोलिसांकडून ‘गणसेवकां’चे कवच)

ज्यामुळे दोन्हीं प्रकारच्या मूर्ती ओळखणे शक्य होते. परंतु गणेशोत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा अशी मागणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पत्रानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा गणेश मुर्तिकांरांना निर्देश देत गणेश मूर्तीवर शिक्का मारला जाऊ नये आणि यापूर्वीच प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे अशाप्रकारच्या सुचना केल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.