मुंबईतील हवेतील वाढत्या प्रदुषणावर (air pollution) नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असून याचा एक भाग म्हणून रस्तेही पाण्याने धुतले जात आहेत. हे रस्ते पाण्याने धुण्यासाठी आतापर्यंत १२१ टॅकरचा वापर केला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र यामध्ये आणखी २५० टँकरची भर पाडण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने (Municipal administration) घेतला आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना प्रत्येकी दहा टँकरची सेवा अधिक घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्याने आता खासगी टँकर भाड्याने घ्यावे लागणार आहे. त्यामुळे आजवर पिण्याव्यतिरिक्त तसेच पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या टँकरवाल्यांची आता चलती असून एकप्रकारे रस्ते धुण्याच्या नावाखाली आता टँकरवाल्यांची तळी भरली जाणार आहे. (BMC)
मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यातून पसरणारी धूळ तसेच एकूणच वायू प्रदूषण (air pollution) रोखण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना केल्या आहेत. त्यासोबतील स्वच्छता मोहिमेतून (Cleanliness campaign) पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ केले जात आहेत. महानगरपालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ नियंत्रण यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. आजमितीला संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्यात येत आहेत. त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर आणि इतर संयंत्र, मनुष्यबळ कार्यरत आहेत. आता यापुढे दररोज एक हजार किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन पाण्याने धुवायचे उद्दिष्ट ठरवले आहे, त्यादृष्टीने काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात घेतलेल्या आढावा घेताना केल्या. या बैठकीत सध्या धुण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांबाबत राज्याचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) असमाधानी असून दररोज एक हजार किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून पाण्याने धुण्याच्या सूचना त्यांनी केल्याने महापालिका आयुक्तांनी त्यानुसार या सूचना केल्याची माहिती मिळत आहे. (BMC)
९० टँकर भाडेतत्वावर
मुंबईत एकूण दोन हजार किलोमीटरचे रस्ते असून त्यातील एक हजार किलोमीटरचे रस्ते दररोज धुण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाला अतिरिक्त दहा टँकर वाढवण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे सध्या महापालिकेच्या मालकीचे एकूण ३० टँकर असून सुमारे ९० टँकर हे भाडेतत्वावर विभाग पातळीवर घेण्यात आले आहे. त्यामुळे या १२१ टँकरच्या तुलनेत अधिक २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी दहा प्रमाणे सुमारे २५० खासगी टँकरची सेवा भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी विहिर, कुपनलिका, रिंगवेल आदींसह विविध ठिकाण असलेल्या मल जल शुध्दीकरण प्रकल्पातील (Sewage treatment project) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर हे रस्ते धुण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)
(हेही वाचा – Girish Mahajan : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण सरकार देणारच)
मुंबईकरांच्या पैशांचा चुराडा
सध्या भाडे तत्वावर घेण्यात येणाया टँकरना अतिदाबाने पाणी मारण्यासाठीचे प्रेशर पाईप नसून टँकरच्या मोठ्या पाईपद्वारेच पाणी पुरवले जाते व मारले जाते. परिणामी पाणी जास्त वापरले जाते आणि रस्ते आवश्यकतेनुसार साफ होत नाही. त्यामुळे अतिदाबाने पाणी मारणारे पाईप जोडले जात नसल्याने याचा फारसा उपयोग होत नाही. खासगी टँकर मालक तथा चालक अशाप्रकारचे पाईप जोडून देत नाही. त्यामुळे त्यांना विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पाण्यासह टँकरच्या भाड्याचे पैसे दिले जातात. आपल्या विहिर आणि बोअरवेलमधील पाण्याचे पैस वजा करून भाड्याचे पैसे दिले जातात. (BMC)
मात्र आता आणखी २५० टँकर धेतले जाणार असल्याने त्यांनाही अशाचप्रकारे पाण्यास भाड्याचे पैसे दिले जाणार असून त्याचा वापर प्रत्यक्षात काही होणार नाही. त्यामुळे एकप्रकारे मुंबईकरांचा पैसा पाण्यात जाणार असून केवळ टँकरवाल्यांची तळी भरली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते धुण्यासाठी या टँकरच्या सेवांवर कोट्यवधी रुपये खर्च होणार असल्याने मुंबईकरांच्या पैशांचा चुराडा आवश्यक नसताना होत असल्याचेही बोलले जात आहे. शिवाय विहिर आणि बोअरवेलमधीलही पाणी अधिक वापरले जाणार आहे. रस्त्यावरील धुळ पाण्याने धुतल्यानंतर पाण्याबरोबरच यातील माती पर्जन्य जलवाहिन्या किंवा मलवाहिन्यांमध्ये वाहून जातात. परिणामी हाच गाळ काढण्यासाठी मग कोट्यवधी रुपये खर्च केले जातात असे निवृत्त अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community