मुंबई सेंट्रल पार्क या नावाने ओळखण्यात येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्याची व त्यानुसार प्रत्यक्ष स्थळावरील स्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी (२३ मार्च) सकाळपासून पाहणी केली. यामध्ये महालक्ष्मी रेस कोर्सचे प्रवेशद्वार, गवती धावपट्टी (ग्रास ट्रॅक), वाळूची धावपट्टी (सँड ट्रॅक), घोड्यांच्या तबेल्यांचे ठिकाण, पोलो मैदान तसेच प्रेक्षकगृह (गॅलरी) आदी सर्व ठिकाणी भेटी देवून सध्या सुरु असलेला वापर आणि नियोजित आराखड्यानुसार केली जाणारी कार्यवाही यांची सविस्तर माहिती आयुक्त गगराणी यांनी जाणून घेतली. (Mumbai Central Park)
या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (मालमत्ता) विनायक विसपुते, सहायक आयुक्त (जी दक्षिण) संतोष धोंडे, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम आणि संबंधित अधिकारी तसेच मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडचे सचिव निरंजन सिंग आदी उपस्थित होते. भेटीनंतर मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतिपथावरील कामाचीही त्यांनी पाहणी केली. (Mumbai Central Park)
(हेही वाचा – Maratha Reservation : सरकार मराठा आंदोलकांवरील किती गुन्हे घेणार मागे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती)
रॉयल इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला केवळ ९१ एकर जागाच भाडेतत्वावर
मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्सची एकूण २११ एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्यावर दिलेली होती. त्याची मुदत संपल्यानंतर या २११ एकर जागेपैकी १२० एकर जागा शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास महाराष्ट्र शासनाने अलीकडे मान्यता दिली. तर उर्वरित ९१ एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. रेसकोर्सच्या भूखंडापैकी मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द केलेल्या १२० एकर जागेवर तसेच रेसकोर्स परिसरामध्ये लागून असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये १७० एकर जागेवर असे दोन्ही मिळून एकूण ३०० एकर जागेवर सार्वजनिक उद्यान (थीम पार्क) विकसित करण्याचे नियोजित आहे. (Mumbai Central Park)
पार्कच्या निर्मितीनंतर रेसकोर्स व सार्वजनिक उद्यान यांची सुरळीत देखभाल
महालक्ष्मी रेस कोर्सचे प्रवेशद्वार, गवती धावपट्टी (ग्रास ट्रॅक), वाळूची धावपट्टी (सँड ट्रॅक), घोड्यांच्या तबेल्यांचे ठिकाण, पोलो मैदान तसेच प्रेक्षकगृह (गॅलरी) आदी सर्व ठिकाणी भेटी देवून सध्या सुरु असलेला वापर आणि नियोजित आराखड्यानुसार केली जाणारी कार्यवाही यांची सविस्तर माहिती आयुक्त गगराणी यांनी जाणून घेतली. रेसकोर्सवरील सार्वजनिक उद्यान आणि पलीकडील मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील उद्यान यांना जोडण्यासाठी भूयारी मार्ग, नागरिकांच्या तसेच वाहनांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था, पार्कच्या निर्मितीनंतर रेसकोर्स व सार्वजनिक उद्यान यांची सुरळीत देखभाल यादृष्टिने आवश्यक सर्व तपशिलांची माहिती उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी दिली. त्यानंतर या सार्वजनिक उद्यानाच्या कार्यवाहीला वेग देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले. (Mumbai Central Park)
(हेही वाचा – MLA Bachu Kadu: अमरावतीची जागा भाजपाला जाताच, बच्चू कडूंनी दिलं ‘हे’ उत्तर)
सागरी सेतूला जोडण्यासाठी सुमारे १२० मीटर लांबीचा गर्डर लवकरच
यानंतर, आयुक्तांनी वरळीतील बिंदूमाधव ठाकरे चौक येथून मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावर प्रवेश करुन प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली. वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडण्यासाठी किनारी रस्त्याच्या मार्गिकेचे काम वेगाने व वेळेत पूर्ण होईल, असे प्रयत्न करावेत, जेणेकरुन उत्तरेकडे जाणाऱ्या वाहतुकीचाही वेग वाढेल, असे निर्देश आयुक्तांनी दिले. सागरी सेतूला जोडण्यासाठी सुमारे १२० मीटर लांबीची तुळई (गर्डर) लवकरच स्थापन करण्यात येईल, त्यासाठी प्राधान्याने कामे सुरु आहेत, असे प्रमुख अभियंता निकम यांनी नमूद केले. (Mumbai Central Park)
प्रकल्पाची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्णत्वास जातील
प्रकल्पातील विहार क्षेत्र (प्रॉमिनाड), सागरी संरक्षण भिंत, सायकल ट्रॅक, पादचारी भूयारी मार्ग, हाजी अली आंतरमार्गिका तसेच उत्तरवाहिनी मार्गिकेचे काम इत्यादी ठिकाणी पायी फिरुन सर्व कामांची, प्रगतीची आयुक्त गगराणी यांनी माहिती घेतली. त्यानंतर मरीन ड्राइव्हच्या दिशेने दक्षिणवाहिनी भूयारी मार्गातून प्रवास करताना भूयारी मार्गातील आपत्कालीन स्थितीसाठी केलेल्या उपाययोजना, अग्निशन सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरा या सर्वांची पाहणी केली. एवढेच नव्हे आपत्कालीन संपर्क यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून यंत्रणा तत्परतेने कार्यरत असल्याची खातरजमा देखील त्यांनी केली. दोन्ही जुळ्या बोगद्यांना जोडणारे छेद बोगदे, त्याचप्रमाणे उत्तर दिशेच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या भूयारी बोगद्याची त्यांनी पाहणी केली. प्रकल्पाची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्णत्वास जातील, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना तसेच प्रकल्प सल्लागारांना दिल्या. (Mumbai Central Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community