काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल याची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. प्रामुख्याने ही बैठक मनोरंजन उद्यान आणि क्रीडांगणे यांच्या जागा काळजी वाहू तत्वावर देण्याकरिता जे धोरण बनवले आहे, त्याचे निवेदन देण्यासाठी ही भेट होती. पण प्रत्यक्षात याव्यतिरिक्त अन्य विषयांवरही चर्चा झाली. आणि माजी नगरसेवकांनी आपल्याला आयुक्त आपण भेट देत नसून आपण आम्हाला कधी भेट द्याल अशी विचारणा चहल यांच्याकडे केली. यावेळी आयुक्तांनी, आपण मला जनता दरबार मध्ये भेटू शकतात, असे सांगत काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली. (Mumbai Congress)
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांची सोमवारी दुपारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्यासोबत बैठक पार पडली. मनोरंजन मैदान आणि क्रीडांगणे यांच्या जागा काळजीवाहू तत्त्वावर देण्याबाबत बनवलेल्या धोरणा संदर्भात महापालिकेने जनतेकडून अगदी व सूचना मागवल्या आहेत. त्या हरकती व सूचना संदर्भात निवेदन देण्यासाठी या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये आर. जी आणि पी. जी च्या मुद्द्यावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी या बैठकीमध्ये काँग्रेसचे तीन आमदार उपस्थित आहेत. महापालिकेने सर्व आमदारांना विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. तर मग या तीन आमदारांना महापालिकेच्या विकास निधी का मिळत नाही, अशी विचारणा केली. यावर चहल त्यांनी हे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत आणि त्यांच्या मान्यतेने निधीचं वाटप केलं जातं असे सांगण्याचा प्रयत्न केला. (Mumbai Congress)
मात्र त्यानंतर माजी नगरसेवकांनी आपण सर्व माजी नगरसेवकांना भेटता, पण काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना भेटत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे आपण आमच्या नगरसेवकांना भेटीची वेळ कधी व कशी द्याल याबाबत विचारणा केली. तसेच आमच्या नगरसेवकांना आपण भेट देत नसल्याने नाराजीही त्यांनी व्यक्त केली. यावर चहल यांनी आपण मला जनता दरबार ज्या दिवशी आयोजित असेल त्या दिवशी भेटू शकतात असे सांगत त्यांचा मुद्दा उडवून लावला. यावर माझी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आक्षेप नोंदवत तुम्ही माजी नगरसेवकना जनता दरबार मध्ये बोलावू कसं शकता? त्यांना स्वतंत्र वेळ का दिली जाऊ शकत नाही, अशी विचारणा केली. मात्र, यावर चहल यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांचे म्हणणे ऐकून घेत बैठकच आवरती घेतली आणि त्या सर्वांची रजा घेत ते आपल्या दालनात निघून गेले. (Mumbai Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community