BMC : महानगरपालिकेने जाहीर केली दहा मालमत्ता थकबाकीदारांची यादी

दहा थकबाकीदारांकडे सुमारे १४७ कोटी रुपयांची थकबाकी

4235
BMC : महानगरपालिकेने जाहीर केली दहा मालमत्ता थकबाकीदारांची यादी

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य गाठवण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून निर्धारीत वेळेत हे लक्ष्य गाठणे शक्य नसल्याची बाब समोर येताच आता महापालिकेला पहिल्या दहा थकबाकीदारांची यादीच जाहीर केली आहे. संपूर्ण मुंबईत एकूण असे १४२ बडे थकबाकीदार आहेत, ज्यांच्याकडून आता जुनी वसूली करण्यावर महापालिकेने शेवटच्या १५ दिवसांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. (BMC)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून या दहा मोठ्या थकबाकीदारांकडून महानगरपालिकेला सुमारे १४७ कोटी २४ लाख ७२ हजार १८ रूपयांचे येणे आहे. त्यापैकी काही थकबाकीदारांनी धनादेश (चेक), धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर तातडीने महानगरपालिकेकडे जमा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (BMC)

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या मालमत्ता कराची वसूली आतापर्यंत १२०० कोटीच)

नागरिकांनी त्यांचा मालमत्ता कर ३१ मार्च २०२४ पर्यंत तातडीने महानगरपालिकेकडे (BMC) जमा करावा, याकरिता अधिकारीवर्ग प्रत्यक्षात करदात्यांना भेटून त्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास प्रोत्साहित करत आहेत. नागरिकांना कर देयके विहित कालावधीत टपालामार्फत प्राप्त न झाल्यास महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अथवा विभाग कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. (BMC)

करनिर्धारण आणि संकलन खात्याने आज २४ विभागात १४२ बड्या थकबाकीदारांकडे करवसुलीसाठी पाठपुरावा केला. त्यात ए विभागात (१), बी (७), सी (१), डी (४), ई (३३), एफ दक्षिण (१), एफ उत्तर (४), जी दक्षिण (१२), जी उत्तर (३), एच पूर्व (३), एच पश्चिम (७), के पूर्व (५), के पश्चिम (३), पी दक्षिण (६), पी उत्तर (४), आर दक्षिण (४), आर उत्तर (२), आर मध्य (५), एल (५), एम पूर्व (३), एम पश्चिम (९), एन (८), एस (५), टी (५) यांचा समावेश आहे. (BMC)

(हेही वाचा – Water Cut : मुंबईत पुढचे दहा दिवस ५ टक्के पाणी कपात)

दिनांक १४ मार्च २०२४ रोजी पर्यंतचे टॉप टेन मालमत्ता कर थकबाकीदार
  • मेसर्स एल एण्ड टी क्रॉसरोड ४१ कोटी ३८ लाख ८९ हजार ८३५ रुपये
  • भारत डायमंड बोर्स २५ कोटी ८७ लाख ६८ हजार १७० रुपये
  • सीजुली प्रॉपर्टी लि. २४ कोटी ८९ लाख ६१ हजार ६९७ रुपये
  • वर्मा मेडिसिन रिसर्च ट्रस्ट (ग्लोबल हॉस्पिटल) १६ कोटी ६४ लाख ४२ हजार ०९६ रुपये
  • डी. व्ही. सेठ एण्ड ऑदर्स (प्राईम मॉल) ११ कोटी ५० हजार ८५१ रुपये
  • फिनिक्स मॉल १० कोटी ८२ लाख ८८ हजार १८० रुपये
  • हिंदुस्थान प्लॅटिनम प्रायव्हेट लिमिटेड १० कोटी १५ लाख ९४ हजार ६५ रुपये
  • गोदरेज ग्रीन होम प्रायव्हेट लिमिटेड १० कोटी ५७ लाख ४८ हजार ३८६ रुपये
  • मुक्ता फाऊंडेशन ६ कोटी ६६ लाख १८ हजार १८९ रुपये
  • चंपकलाल ४ कोटी ८१ लाख १७ हजार ४५७ रुपये

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.