कारागृहात जन्माला येणाऱ्या अपत्याच्या जन्म दाखल्यात यापुढे कारागृह ऐवजी शहराचे नाव टाकण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे. सरकारकडून तसा आदेश जारी करून आदेशाची प्रत राज्यातील सर्व कारगृहाला पाठवण्यात आलेली आहे.
आदेश राज्यातील सर्व कारागृहांना पाठविण्यात आला
अटक करण्यात येणाऱ्या काही महिला गर्भवती असतात, अशा गर्भवती महिलांना ज्या कारागृहात ठेवण्यात येते, त्या ठिकाणी त्यांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर आणि प्रसूतिगृह उपलब्ध असतात, कारागृहातील प्रसूतिगृहात त्यांची प्रसूती झाल्यानंतर त्यांना होणाऱ्या बाळाच्या जन्म दाखल्यावर जन्मस्थळ म्हणून कारागृह असे नोंद करण्यात येत होती. मुलं सहा वर्षांचे होईपर्यंत त्याला आईसोबत महिला कारागृहात ठेवले जाते, मुलं सहा वर्षांचे झाल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येते. कारागृहात जन्माला आल्यानंतर त्या मुलांच्या जन्म दाखल्यावर जन्मस्थळ म्हणून कारगृहाची नोंद होत असल्यामुळे त्याची काही एक चूक नसतांना त्याच्यावर कारागृहात जन्म झाल्याचा ठप्पा लागत होता. मात्र यापुढे त्याच्या जन्म दाखल्यावरील कारागृह हा ठप्पा पुसला जाणार आहे, राज्य सरकारने नुकताच एक आदेश जारी करत या आदेशात यापुढे तुरुंगात जन्माला येणाऱ्या मुलाच्या जन्म दाखल्यावर कारागृहाचे नाव न टाकता शहर किंवा गावचे नाव टाकावे, असे नमूद केले आहे. हा आदेश राज्यातील सर्व कारागृहांना पाठविण्यात आला आहे.
(हेही वाचा याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?)
Join Our WhatsApp Community