एसटी अपघातात मृत्यू झालेल्या मृतांची ओळख पटली, अशी आहेत मृतांची नावे

127

इंदौरहून जळगाव येथे येणा-या एसटीच्या बसचा सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. नर्मदा नदीवरील पुलावरुन ही बस नदीत कोसळून या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत राज्यासह संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू असून या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात येत आहे.

13 मृतांपैकी 8 मृतांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांची नावे आता देण्यात येत आहेत. त्यातील 5 जण हे महाराष्ट्रातील असल्याचे समजत आहे. तसेच मृतांमध्ये एसटीचे चालक आणि वाहक यांचा देखील समावेश आहे.

(हेही वाचाः मध्य प्रदेश एसटी अपघात: मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळाकडून 10 लाखांची मदत! मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

मृतांची नावे

  1. प्रकाश श्रवण चौधरी, वय-40, (एसटीचे वाहक), राहणार- अमळनेर (जळगाव)
  2. चंद्रकांत एकनाथ पाटील, वय-45,(एसटीचे चालक), राहणार- अमळनेर(जळगाव)
  3. नीबाजी आनंदा पाटील, वय-60, राहणार-पिलोदा (अमळनेर)
  4. कमला नीबाजी पाटील, वय-55, राहणार- पिलोदा (एमळनेर)
  5. अरवा मुर्तजा बोरा, वय-27, राहणार-अकोला
  6. सैफुद्दीन अब्बास, राहणार- इंदौर
  7. चेतन रामगोपाल जांगिड, राहणार-जयपूर (राजस्थान)
  8. जगन्नाथ हेमराज जोशी, वय- 70, राहणार-उदयपूर(राजस्थान)

(हेही वाचाः इंदोर-अमळनेर MSRTC बस अपघाताबाबत मोदी, शिंदे, फडणवीसांनी व्यक्त केला शोक)

यापैकी काही मृतांची ओळख ही ओळखपत्राद्वारे करण्यात आली असून, काही मृतांची ओळख ही त्यांच्या नातेवाईकांद्वारे करण्यात आली आहे. एसडीआरएफकडून आतापर्यंत 15 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून बसमध्ये 50 ते 55 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.