राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मोबाईल फोन आणि इंटरनेट अॅक्सेसिबिलिटी असलेल्या इतर उपकरणांचा वापर करणा-या मुलांवर होणा-या परिणामांवर अभ्यास केला आहे. त्यानुसार, 23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्ट फोन वापरतात. वाढत्या वयानुसार, ही प्रवृत्ती वाढत जाते. त्याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे.
मुलांमधील ‘ही’ सवय धोकादायक
मुले स्मार्टफोनचा अधिक वापर करु लागली आहेत. हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक आहे. जेव्हा लहान मुले जेवण करत नाहीत तेव्हा पालक त्यांना मोबाईल फोन देऊन खायला देतात, इथेच ही सवय तयार होते. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायला हवे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: ‘या’ प्रकरणात Flipkart आणि Amazon ला दिल्ली पोलिसांनी बजावली नोटीस )
- 23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरतात
- 31.15 टक्के मुलांमध्ये स्मार्टफोनच्या वापरामुळे एकाग्रतेची कमतरता
- 5.30 टक्के मुले 4 तासांपेक्षा अधिक वेळ स्मार्टफोनमध्ये असतात.
- 32.7 टक्के मुले अभ्यास करताा स्मार्टफोन चेक करतात.
पालकांनी काय करावे?
मुलांना मोकळे ठेवू नका. त्यांना नवीन नवीन गोष्टीत गुंतवून ठेवा. मोबाईल देणे टाळा. मुलांजवळ जर अधिक वेळ आहे तर त्यांच्याकडून घरातील कामे करुन घ्यावीत. त्यांना नवीन काही गोष्टी शिकवाव्यात.
Join Our WhatsApp Community