राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदाम्पत्य विठ्ठलाच्या (Vitthal Rukmini) दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) येतात. आलेल्या नवदाम्पत्याला गेल्या अनेक वर्षापासून मंदिरात थेट दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली होती. मात्र हीच घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी पुन्हा एकदा केली आहे. विशेष म्हणजे केवळ नवदाम्पत्यच (newlyweds) नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. (Pandharpur)
व्हीआयपी दर्शन बंद
आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ यात्रेसाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्राप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असून भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. (Pandharpur)
दर्शनासाठी वेळ वाढ
पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा या वेळात आता थेट दर्शन दिले जाणार आहे. यापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी सकाळी सहा ते साडेसहा एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा. बैठकीत ही वेळ वाढविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनाही विठुरायाचे दर्शन सुलभ रीतीने होणार आहे. (Pandharpur)
अंध, अपंग, दिव्यांगांना व्हील चेअरची व्यवस्था
विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध, अपंग, दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे. अंध , अपंगांसोबत आता नवविवाहितांनाही झटपट दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले. (Pandharpur)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community