राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढणार; Adv. Ashish Shelar यांची मोठी घोषणा

59
राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढणार; Adv. Ashish Shelar यांची मोठी घोषणा
  • प्रतिनिधी 

राज्यातील डिजिटल सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांचे जाळे आणखी विस्तारीत करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी बुधवारी विधानसभेत केली.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय सेवा अधिक गतीने आणि सोप्या पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यावेळी मंत्री शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी सेवा केंद्रांबाबतचे सुधारित निकषही जाहीर केले.

(हेही वाचा – विधानसभा उपाध्यक्षपदी Anna Bansode यांची बिनविरोध निवड)

ग्रामपंचायत आणि शहरी भागातील बदललेले निकष

सुधारित निकषांनुसार, ५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी आता १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात येणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २५,००० लोकसंख्येसाठी १ सेवा केंद्र देण्यात येत होते. आता १२,५०० लोकसंख्येसाठी २ सेवा केंद्रे देण्यात येणार आहेत. इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये १०,००० लोकसंख्येसाठी १ सेवा केंद्र ऐवजी २ सेवा केंद्रे उभारली जातील.

नगरपंचायतींसाठीही मोठा बदल करण्यात आला असून, प्रत्येक नगरपंचायतीसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे आणि ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे उभारली जाणार आहेत.

(हेही वाचा – Shri Vitthal Rukmini Temple संस्थानची 30 कोटींची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार)

सेवा शुल्कात वाढ

‘आपले सरकार सेवा केंद्रां’वरील सेवा शुल्क आता २० रुपयांवरून ५० रुपयांवर वाढविण्यात येणार आहे. २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढत्या महागाईचा विचार करून आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सेवा शुल्काचे नवीन विभाजन पुढीलप्रमाणे –
  • राज्य सेतू केंद्राचा वाटा : ५% (₹२.५)
  • महाआयटी वाटा : २०% (₹१०)
  • जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा : १०% (₹५)
  • आपले सरकार सेवा केंद्र चालक (VLE) वाटा : ६५% (₹३२.५०)

(हेही वाचा – Mumbai Airport वर शौचालयाच्या कचरापेटीत सापडले मृत अर्भक)

घरपोच सेवा सुविधा

नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळावी यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येणार आहे. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क १०० रुपये प्रति नोंदणी (कर वगळून) असेल. यामध्ये महाआयटीचा वाटा २०% आणि सेवा केंद्र चालकाचा वाटा ८०% असेल. याशिवाय प्रत्येक अर्जावर अतिरिक्त ५० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.

मंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले, “राज्यातील नागरिकांना अधिक जलद आणि सुलभ डिजिटल सेवा मिळाव्यात यासाठी शासन सातत्याने उपाययोजना करत आहे. हा निर्णय राज्याच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेस चालना देणारा आणि शासकीय सेवा वितरण अधिक प्रभावी करणारा ठरणार आहे.”

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना शासकीय सेवा सहज उपलब्ध होतील तसेच ग्रामिण भागातही डिजिटल सेवा सुलभ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.