मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होताच कोरोनाची रुग्णसंख्या हजारांच्याही खाली आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आता राज्यात केवळ ९६५ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. २२ जिल्ह्यांमध्ये केवळ एक आकडी रुग्णसंख्या उरली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९८.११ टक्के नोंदवला गेला आहे.
गुरुवारच्या नोंदणीत १३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर २५५ जणांना डिस्चार्ज दिल्याची माहिती दिली गेली. आता कोरोना मृत्यूची दरदिवसा नोंद एक आकड्यावर नोंदवली जात आहे. कित्येक दिवस राज्यात एकाही मृत्यूची नोंद होत नाही आहे. गुरुवारीही ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिन्ही मृत्यू पुण्यात झाले. राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के मृत्यूदर नोंदवला जात आहे.
( हेही वाचा : आता रेल्वे प्रवासात जेवणाचे नो टेन्शन! २ एप्रिलपासून ही सुविधा सुरू )
कोरोनामुक्त जिल्हे –
रत्नागिरी, हिंगोली, वाशिम, भंडारा, यवतमाळ
जिल्हानिहाय तीन आकडी कोरोना रुग्णसंख्या –
मुंबई – २५८, पुणे – २४०, ठाणे – १४९
जिल्हानिहाय दोन आकडी कोरोना रुग्णसंख्या –
रायगड – २०, सातारा – २६, कोल्हापूर – १३, नाशिक – ३७, अहमदनगर – ८२, औरंगाबाद – २९, बीड – १३, बुलडाणा – ११, नागपूर – १९
जिल्हानिहाय एक आकडी कोरोना रुग्णसंख्या –
पालघर – ६, सिंधुदुर्ग- ७, सांगली -२, सोलापूर – २, जळगाव – ३, नंदूरबार – १, धुळे – २, जालना -२, लातूर – ७, परभणी – ७, नांदेड – ७, उस्मानाबाद – ४, अमरावती – ५, अकोला – २, वर्धा -१, गोंदिया – २, चंद्रपूर – ३, गडचिरोली – ३
Join Our WhatsApp Community