कोविड रुग्ण संख्येची उलटी गिनती सुरु! कशी ते वाचा…

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,१८५ दिवस एवढा आहे.

120

मुंबईतील कोविड रुग्णांच्या संख्येची उलटी गिनती आता सुरु झाली असून शनिवारी दिवभरात केवळ ३६५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ४४१ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर सक्रिय रुग्णांची आकडेवारी वाढलेली असून शनिवारपर्यंत विविध ठिकाणच्या जंबो कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ४ हजार ६६६ रुग्णांवर उपचार सुरु होते.

४८ हजार ५२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या!

मागील बुधवारी दिवसभरात केलेल्या ४८ हजार ५२१ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ५३० नवीन रुग्ण आढळून आले होते. तर गुरुवारी ४८ हजार ७१२ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४५८ नवीन रुग्ण आढळून आले होते, तर शुक्रवारी यापेक्षा अधिक म्हणजे ४९ हजार ९२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४४१ रुग्ण आढळून आले आहे. तर शनिवारी ३५ हजार ८५१ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ३६५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांमध्ये कोविड चाचण्या वाढवल्यानंतरही रुग्णाांची संख्या साडेचारशेच्या आसपासच राहिल्यामुळे मुंबईकरांसाठी समाधानाची गोष्ट आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञांच्या मते १० सप्टेंबरपर्यंत रुग्णांची न वाढल्यास मुंबईतील धोका कमी होईल. त्यामुळे बुधवारी वाढलेली रुग्ण संख्येनंतर पुढील तीन दिवसांमध्ये घटलेली संख्या ही तिसऱ्या लाटेचा प्रभाव नसल्याचा संकेत असावा असेही बोलले जात आहे.

(हेही वाचा : फडणवीस निघाले गुजरातला, मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला! फडणवीस होतायेत ट्रोल!)

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,१८५ दिवस!

शनिवारी दिवसभरात २३२ रुग्ण बरे होवून घरी परतले आणि ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ रुग्ण दीर्घकालिन आजारी होते. यामध्ये १ पुरुष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील एक रुग्ण हा चाळीशीतील असून दोन रुग्णांचे वय हे साठीपार होते, तर उर्वरीत एका रुग्णाचे वय हे ४० ते ६० वयोगटातील होते. रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे, आणि मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,१८५ दिवस एवढा आहे. झोपडपट्टया आणि चाळी या पुन्हा कोरोनामुक्त झाल्या आहेत. दिवसभरात एकही नवीन झोपडपट्टी, चाळीची नोंद सक्रिय कंटेन्मेंट झोनमध्ये झाली नसून ही संख्या शुन्यावर आहे. तर शनिवारी सीलबंद असलेल्या इमारतींची संख्या ४३ एवढी होती.

मागील ११ दिवसांमधील रुग्ण संख्या आणि मृत्यूचा आकडा

  • शनिवारी ११ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३६५, मृत्यू -४
  • शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४१, मृत्यू -५
  • गुरुवारी ९ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४५८, मृत्यू-६
  • बुधवार ८ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ५३०, मृत्यू -४
  • मंगळवार ७ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३५३, मृत्यू -२
  • सोमवार ६ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३७९, मृत्यू -५
  • शनिवारी ५ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४९६, मृत्यू -२
  • रविवारी ४ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४१६, मृत्यू -४
  • सोमवारी ३ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४२२, मृत्यू -३
  • मंगळवारी २ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४१, मृत्यू -३
  • बुधवार १ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४१६, मृत्यू -४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.