धारावीत पुन्हा जून, सप्टेंबरचा प्लॅशबॅक!

मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागात मोडणाऱ्या धारावी, दादर आणि माहिम या तिन्ही भागांमध्ये रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे.

195

धारावीमध्ये एप्रिल महिन्यापासून वाढलेल्या कोरोनाचा आजार जुनपासून नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश आले असले तरी पुन्हा सप्टेंबर महिन्यात या भागातील आजाराने डोके वर काढले होते. परंतु त्यानंतर धारावीतील कोरोनाचा आजार मृतप्राय अवस्थेत असतानाच पुन्हा एकदा या आजाराने उचल खाल्लेली पाहायला मिळत आहे. गुरुवारी, 18 मार्च रोजी या भागात तब्बल ३० रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी ३३ रुग्ण आणि त्यापूर्वी १ जून रोजी ३४ रुग्ण आढळून आले होते. परंतु त्यानंतर या भागातील रुग्ण संख्या एकेरी आकड्यात आली होती.

जी उत्तर विभागात गुरुवारी १०२ रुग्ण आढळून आले!

मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागात मोडणाऱ्या धारावी, दादर आणि माहिम या तिन्ही भागांमध्ये रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली. या जी उत्तर विभागात गुरुवारी १०२ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये धारावीमध्ये ३० रुग्ण, दादरमध्ये ४१ आणि माहिममध्ये ३१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या जी उत्तर विभागात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १४ हजार ९५० एवढी झाली आहे.

(हेही वाचा : महापालिका, सरकारच्या उदासिन धोरणात व्हिक्टोरियाची चाके ‘अडकली’!)

सध्या धारावीमध्ये १४० रुग्णांवर उपचार सुरु!

धारावीत दिवसभरात ३० रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत शांत असणाऱ्या धारावीत आता पुन्हा या आजाराने डोकेवर काढले आहे. जून आणि सप्टेंबर या नंतरची ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. दिवसभरात ३० रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्ण संख्या ४,३२८ वर पोहोचली आहे. सध्या धारावीमध्ये १४० रुग्णांवर उपचार सुरु आहे.

दादरमध्ये गुरुवारी रुग्ण संख्या दुपटीने वाढली!

दादर-माहिम या भागातील दादरमध्ये सर्वांधिक ४१ रुग्ण असून माहिममध्ये ३१ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे दोन्ही भागातील एकूण रुग्ण संख्या अनुक्रमे ५,३५४ आणि ५,२६८ एवढी झाली आहे. दादरमध्ये बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दुपटीने रुग्ण संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. दरम्यान गुरुवारी महापालिका तसेच कुंभारवाडा आरोग्य केंद्रामार्फत असंसर्गजन्य आजाराबाबत जागरुकता आणि व माहिती आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना नगरसेविका हर्षला आशिष मोरे यांनी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.