मुंबईत सोमवारी रुग्ण संख्या घटली…अशी आहे स्थिती!

सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी प्रसिध्द केलेल्या कोविडच्या दैनंदिन अहवालानुसार, दिवसभरात ६ हजार ९०५ रुग्ण आढळले.

मुंबईत वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब ठरत असताना, सोमवारी दिवसभरात सुमारे सात हजार रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत दरदिवशी दहा हजार बाधित रुग्ण आढळून येत असताना सोमवारी ६ हजार ९०५ रुग्ण आढळून आले आहेत, तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे संख्या

सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी प्रसिध्द केलेल्या कोविडच्या दैनंदिन अहवालानुसार, दिवसभरात ६ हजार ९०५ रुग्ण आढळले. दिवसभरात ९ हजार ३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारपर्यंत ९० हजार २६७ रुणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसभरात ३९ हजार ३९८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, मृत्यू झालेल्या ४३ रुग्णांपैकी ३६ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यामध्ये ३० पुरुष आणि १३ महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३६ दिवसांवर आला आहे. तर कोविड वाढीचा दर १.८९ टक्के एवढा आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ९१९ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या झोपडपट्टया व चाळींची संख्या ८५ एवढी झाली आहे.

(हेही वाचाः नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा!)

दिवसभरात ३९ हजार ३०० जणांचे लसीकरण

मागील तीन दिवसांपासून अनेक लसीकरण केंद्रं बंद ठेवण्यात आल्यानंतर सोमवारी ही सर्व केंद्रं पूर्ववत सुरू झाली. मात्र, सोमवारी दिवसभरात ३९ हजार ३०० जणांचे लसीकरण पार पडले. यामध्ये ३२ हजार ८३४ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर, ६ हजार ४६६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील २५ हजार ६१७ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. तर १० हजार ५४१ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. ७८६ आरोग्य विभागातील कर्मचारी आणि २३६ फ्रंटलाईनवरील कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here