मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख घसरतोय! 

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ३२६ दिवसांवर आला आहे.

मुंबईतील कोरेानाबाधित रुग्णांचा आकडा १,४०० च्या खाली उतरला आहे. शुक्रवारी जिथे १,४१३ रुग्ण आढळून आले होते, तर शनिवारी दिवसभरात १,२९९रुग्णआढळले. दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला.

२९ हजार २६४ कोरोना चाचणी करण्यात आली!  

शुक्रवारी दिवसभरात ३३ हजार ७८ कोविड चाचणी करण्यात आली होती आणि दिवसभरात १,४१६ रुग्ण आढळून आले होते. शनिवारी २९ हजार २६४ कोरोना चाचणी करण्यात आली, तर १,२९९ रुग्ण आढळून आले. तर शनिवारी दिवसभरात १ हजार ८२७ रुग्ण बरे होवून घरी परतले. शनिवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २८ हजार ५०८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होता. शुक्रवारी जिथे ५४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शनिवारी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा : पंकजा मुंडेंना सर्वधर्म समभावाचा साक्षात्कार! सोशल मीडियात ट्रोल!)

रुग्ण दुपटीचा दर हा ३२६ दिवसांवर आला!  

या मृत्यू पावलेल्या रूग्णांमध्ये ३७ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर यामध्ये ३६ पुरुष आणि १६ महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील ०२ रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ३६ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १४ एवढी होती. मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ३२६ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत  २४६ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही ६२ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here