मुंबईतील रुग्णांची संख्या रोडावतेय!

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५६६ दिवसांवर आला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या मागील आठवडाभरापासून रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. बुधवारी, ९ जून रोजी संपूर्ण दिवसभरात जिथे ७८८ रुग्णांची नोंद झाली होती, तिथे गुरुवारी त्यात रुग्ण संख्या आणखी कमी होऊन ६६० रुग्ण आढळून आले. संपूर्ण दिवसभरात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२२ रुग्णांचा मृत्यू!

गुरुवारी संपूर्ण दिवसभरात ७८८ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २५ हजार ३९६ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गुरुवारपर्यंत १५ हजार रुग्णांवर उपचार सरु आहेत. बुधवारी २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे गुरुवारी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १८ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये १४ पुरुष आणि ८ महिला रुग्णाचा समावेश होता. यामध्ये ६० वर्षांवरील १९ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ३ एवढी होती.  सोमवारी, ७ जूनपासून मुंबईत अनलॉक सुरु झाले, अशा वेळी रुग्ण संख्या कमी होत आहे, हे सकारात्मक बाब आहे.

(हेही वाचा : यंदा ५वी पास मुन्नाभाई १०वी पास होणार! )

रुग्ण दुपटीचा दर ५६६ दिवसांवर आला!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५६६ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ९३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही २५ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here