मुंबईतील रुग्ण संख्या हजाराच्या आतच! 

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५११ दिवसांवर आला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या मागील चार दिवसांपासून नियंत्रणात आहे. शुक्रवारी, ४ जून रोजी संपूर्ण दिवसभरात जिथे ९७३ रुग्णांची नोंद झाली होती, तिथे शनिवारी ८६६ रुग्ण आढळून आले. संपूर्ण दिवसभरात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी २९ रुग्णांचा मृत्यू झाला!

शुक्रवारी संपूर्ण दिवसभरात १ हजार ४५ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २६ हजार ६६९ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शनिवारपर्यंत १६ हजार १३३ रुग्णांवर उपचार सरु आहेत. शुक्रवारी जिथे २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे शनिवारी २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २० रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये १४ पुरुष आणि १५ महिला रुग्णांचा समावेश होता. यामध्ये ४० वर्षांखाली ०३ रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील १४ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १२ एवढी होती.

(हेही वाचा : ‘६ जून’ नव्हे तर ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’ तिथीला शिवराज्याभिषेक दिन!)

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५११ दिवसांवर!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५११ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ११६ इमारती सील तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही २७ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here