राज्यात कोविड दर घसरत असला तरी, राज्यातील जवळजवळ 11 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची संख्या वाढत,असल्याचं दिसून आलं आहे. राज्यातील सरासरी कोविड साप्ताहिक रुग्णांपेक्षा जिल्हयांमध्ये पॉझिटिव्ह कोविड दर राज्याच्या सरासरी 1.02 टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर नियंत्रणासाठी वेळीच पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर असलेले जिल्हे
अकोला (2.77), अमरावती (2.56), बुलढाणा (2.33), सिंधुदुर्ग (2.21), पुणे (2.07), बीड (1.79), नाशिक (1.87),सोलापूर (1.39), पालघर (1.34), अहमदनगर (1.31),आणि सांगली (1.09) या जिल्ह्यांचा कोविड पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे.
मुंबईत संसर्गाचा वेग मंदावला
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून, कोरोना वाढीचा दर 0.02 पर्यंत खाली आला आहे. बरेच महिने मुंबईतील कोरोना वाढीचा दर 0.03 वर स्थित होता. मात्र पॉझिटिव्हिटी दर आणखी कमी झाल्याने, कोरोना संसर्गाचा वेग आणखी मंदावल्याचे दिसते. शुक्रवारी 230 नवीन रुग्ण आढळले असून, गुरुवारच्या तुलनेत रुग्णसंख्या काहीशी वाढली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. 2 हजार 343 पर्यंत रुग्णसंख्या खाली आली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला आहे.
( हेही वाचा : दिंडीत भरधाव पिकअप घुसला; २० पेक्षा जास्त वारकरी जखमी, दोघांचा मृत्यू )
Join Our WhatsApp Community