मुंबईतील रुग्ण संख्या पाचशेपार : दिवसभरात ५३० नवीन रुग्ण

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,२५३ दिवस एवढा आहे.

102

मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या आता वाढतच जात असून बुधवारी दिवसभरात ५३० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात करण्यात आलेल्या ४८ हजार ५३१ कोविड चाचण्यांमध्ये ५३० रुग्ण आढळून आले असून संपूर्ण मुंबईत सध्या ३ हजार ८९५ रुग्णांवर विविध ठिकाणच्या जंबो कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

४८ हजार ५२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या!

मुंबईत मंगळवारी जिथे ३८ हजार ४८४ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ३५३ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी दिवसभरात केलेल्या ४८ हजार ५२१ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ५३० नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ३४९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा : पेंग्विननंतरही राणीबागेतील पर्यटकांची संख्या घटली!)

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,२५३ दिवस एवढा

मृत्यू पावलेल्या ४ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे होते. यामध्ये ४ पुरुषांचा समावेश आहे. यातील दोन रुग्ण साठीपार आहेत. तर दोन रुग्णांचे वय हे ४० ते ६० वयोगटातील होते. रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे आणि मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,२५३ दिवस एवढा आहे. झोपडपट्टया आणि चाळी या कालपर्यंत कोरोनामुक्त होत्या, परंतु बुधवारी दिवसभरात एका नवीन झोपडपट्टी, चाळीची नोंद सक्रिय कंटेन्मेंट झोनमध्ये झाली आहे. तर बुधवारी सीलबंद असलेल्या इमारतींमध्ये गुरुवारी तीनची भर पडली आहे. बुधवारी सीलबंद इमारतीची संख्या ५० एवढी होती.

मागील दोन आठवड्यातील रुग्ण संख्या आणि मृत्यूचा आकडा

  • बुधवार ८ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ५३०, मृत्यू – ४
  • मंगळवार ७ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ३५३, मृत्यू – २
  • सोमवार ६ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ३७९, मृत्यू – ५
  • शनिवारी ५ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ४९६, मृत्यू – २
  • रविवारी ४ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ४१६, मृत्यू – ४
  • सोमवारी ३ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ४२२, मृत्यू – ३
  • मंगळवारी २ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ४४१, मृत्यू – ३
  • बुधवार १ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ४१६, मृत्यू – ४
  • मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३२३, मृत्यू – १
  • सोमवार ३० ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३३४, मृत्यू – २
  • रविवार २९ ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३४५, मृत्यू – २
  • शनिवार २८ ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३८८, मृत्यू – ४
  • शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१: रुग्ण – ३६४, मृत्यू – ५
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.