मुंबईत चाळीशीच्या आतील रुग्णसंख्या दीड महिन्यातच दुप्पट!

आजवरच्या आकडेवारीच्या तुलनते १६ मार्च ते १ मे या कालावधीत मुंबईत शून्य ते ३९ वयोगटातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्ग हा पहिल्या टप्प्यात ५० वर्षांमधील व्यक्तींनाच अधिक होत असल्याचे दिसून येत असले, तरी शून्य ते ३९ वयोगटातील बाधित व्यक्तींची संख्या मार्चपेक्षा दुप्पटीने वाढली असल्याचे समोर येत आहे. आजवरच्या आकडेवारीच्या तुलनते १६ मार्च ते १ मे या कालावधीत मुंबईत शून्य ते ३९ वयोगटातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यामध्ये या वयोगटातील ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शून्य ते ९ वयोगटातील १७ मुलांचा मृत्यू फेब्रुवारीपर्यंत झाला होता. पण दीड महिन्यात या वयोगटातील एकाही मुलाचा मृत्यू झालेला नसून, ३० ते ३९ वयोगटातील ५४ व्यक्तींचा मृत्यू या कालावधीत झाला आहे.

दुप्पटीने वाढ

मुंबईत ११ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर, या आजाराविरोधात आपण सर्व लढत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेच्यावतीने, तसेच सरकारच्यावतीने उपाययोजना रावबल्या जात असल्या, तरी मार्च २०२१ पासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शून्य ते ३९ वयोगटातील कोविडबाधित रुग्णांची आकडेवारी १५ मार्च ते १ मे २०२१च्या कालावधीत दुप्पट वाढलेली पहायला मिळत आहे.

(हेही वाचाः भाजपची आता कोरोनाबाधित रुग्णांसाठी  राज्यव्यापी डॉक्टर सहाय्यता हेल्पलाइन!)

अशी आहे बाधितांची आकडेवारी

शून्य ते ०९ वयोगटातील बाधितांची आतापर्यंतची आकडेवारी ही ५ हजार ७३९ एवढी होती. पण दीड महिन्यात ती ५ हजार २१९ने वाढून १० हजार ९५८ एवढी झाली आहे. तर १० ते १९ वयोगटातील बाधित मुलांचीही संख्या दीड महिन्यात १५ हजार १४ ने वाढली आहे. २० ते २८ वयोगटातील बाधित व्यक्तींची संख्या ५० हजार ८५२ आणि ३० ते ३९ वयोगटातील बाधित रुग्णांची संख्या ६१ हजार ९४६ने वाढल्याचे पहायला मिळत आहे.

१६ मार्चपर्यंत ० ते ३९ वयोगटातील रुग्ण

वय वर्षे ००ते ०९ : ०५ हजार ७३९ (एकूण मृत्यू १७)

वय वर्षे १० ते १९ : १३ हजार ३७७ ( एकूण मृत्यू : ३१)

वय वर्षे २० ते २९ : ४७ हजार ७१९ (एकूण मृत्यू : १२५)

वय वर्षे ३० ते ३९ : ६१ हजार ८६८ (एकूण मृत्यू : ३६४)

१ मेपर्यंत ० ते ३९ वयोगटातील रुग्ण

वय वर्षे ००ते ०९ : १० हजार ९५८ (एकूण मृत्यू : १७)

वय वर्षे १० ते १९ : २८ हजार ३९१ ( एकूण मृत्यू : ३३)

वय वर्षे २० ते २९ : ९८ हजार ५७१ ( एकूण मृत्यू : १३२)

वय वर्षे ३० ते ३९ : १ लाख २३ हजार ८१४ ( एकूण मृत्यू : ४१८)

(हेही वाचाः सर्वांना मोफत लस देण्याच्या मागणीसाठी भाजपचे महापौर दालनाबाहेर निदर्शने!)

मागील दीड महिन्यात वाढलेली रुग्ण संख्या

वय वर्षे ००ते ०९ : ०५ हजार २१९ (एकूण मृत्यू : ००)

वय वर्षे १० ते १९ : १५ हजार ०१४ ( एकूण मृत्यू : ०२)

वय वर्षे २० ते २९ : ५० हजार ८५२ ( एकूण मृत्यू : ०७)

वय वर्षे ३० ते ३९ : ६१ हजार ९४६ ( एकूण मृत्यू : ५४)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here