वाढत्या नागरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटते; BMC सांगणार यावरील उपाय

199
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) , नेचर फॉरएव्हर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणि संग्रहालयातील पेंग्विन इमारत सभागृहामध्ये गुरुवारी २० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘इंडियन स्पॅरोमॅन’ म्हणून ओळख असलेले तथा नेचर फॉरएव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे शहरांमध्ये कमी आढळणाऱ्या चिमणीसाठी, तिच्या संवर्धनासाठी काय करता येईल या विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (उद्याने)  चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडणार आहे. जैवविविधता जतन व संवर्धन करणे, नागरिक व विविध संस्था यामध्ये याबाबतीत जागरूकता निर्माण करणे असे या कार्यशाळेचे उद्दिष्ट असल्याचे संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
चिमणी हा जीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक आहे. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे शहरांमध्ये कमी आढळणाऱ्या चिमणीसाठी, तिच्या संवर्धनासाठी काय करता येईल या विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या नागरीकरणात चिमण्यांची संख्या का कमी होते आहे, आपल्या अंगणातून हरवलेली चिमणी पुन्हा अंगणात कशी आणता येईल, तिच्या संख्येत वाढ होण्यासाठी काय करता येईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे  मोहम्मद दिलावर या कार्यशाळेत देणार आहेत. या कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्था, ‘पेटा’, ‘नरेडेको’ यांचे प्रतिनिधी, उद्यानातील अधिकारी भाग घेणार आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.