यंदा पावसात पोटाच्या आणि घशाच्या संसर्गाने हैराण झालेल्या रुग्णांची संख्या जास्तच दिसून आल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले. संपूर्ण मुंबईत फ्लूमुळे आजार वाढत असताना पोटाच्या आणि घशाच्या संसर्गाने हैराण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जुलै महिन्याच्या मुसळधार पावसाने मुंबईत विविध ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाला. त्यामुळे गेस्ट्रॉ, हेपेटाइटिसचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्याला सुरुवात होताच गेस्ट्रॉ आणि हेपेटाइटिसचे रुग्ण कमी होऊ लागले आहे. मात्र घशाच्या संसर्गाने हैराण झालेल्या रुग्णांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. मुंबईत फ्लू आणि घशाच्या संसर्गावर औषधांचा कोर्स पूर्ण न केल्याने कोरडा घशाच्या तक्रारी २५ टक्क्यांनी वाढल्याचे डॉक्टर्स सांगतात. सुका खोकला किमान पंधरा दिवस राहतो. त्यामुळे डॉक्टरांना सातत्याने दाखवणे गरजेचे असते. मात्र डॉक्टर्स पैसे लुटतात या धारणेतून केवळ एक दिवसाचे औषध घेऊन रुग्ण परत येत नाहीत, अशी तक्रार डॉक्टरांनी केली आहे.
(हेही वाचा – Rainfall : राज्याच्या ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मुंबईसह कोकणात रिपरिप)
सध्याच्या दिवसांत घशाला कोरड पडणे, सतत बोलत राहिल्यास सुका खोकला होणे खूप सामान्य होऊन बसले आहे. तणावाचे काम केल्यासही खोकला चाळवत असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णांना किमान तीन ते चार दिवस सातत्याने एंटीबायोटिक औषधांचा कोर्स पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही. घरगुती उपाय या दिवसांत करू नका. सध्या मलेरिया, डेंग्यूचीही साथ आहे. सर्दी, खोकला अंगावर काढणे जिकरीचे ठरू शकते. घरगुती उपाय म्हणून केवळ कोमट पाणी पिणे, दिवसांतून किमान तीनवेळा गरम पाण्याच्या गुळण्या करणे आदी उपाय करणे योग्य राहील, असेही डॉक्टरांनी सुचवले.
बाहेरचे अन्नपदार्थ टाळा –
- या दिवसांत पावसाच्या हलक्या सरींमध्ये भिजणेही आजाराला निमंत्रण देऊ शकते.
- शिवाय घाणेरड्या, साचलेल्या अशुद्ध पाण्यात जाणेही आरोग्यासाठी हानिकारक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community