कोविड रुग्णांचा पारा उतरला : दिवसभरात सहा हजारांनी घटली संख्या

104

कोविड बाधित रुग्णांची संख्या मागील गुरुवारपर्यंत झपाट्याने वाढत जात तब्बल २० हजारांचा पल्ला गाठल्यानंतर रविवारपर्यंत स्थिरावलेल्या रुग्ण संख्येचा पारा सोमवारी उतरलेला पाहायला मिळाला. दिवसभरात तब्बल सहा हजारांनी घट होत रुग्ण संख्या सोमवारी १३ हजार ६४८ एवढी आढळून आली. विशेष म्हणजे रुग्ण वाढीचा आलेख खाली घसरतानाच दिवसभरात सुमारे २७ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले.

रुग्ण संख्या ६ हजारांनी घटली

मागील मंगळवारपासून दैनंदिन पाच हजारांनी रुग्ण संख्या वाढून २० हजारांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे या रुग्ण संख्येचा स्फोटा होणार की, काय असे वाटत असताना गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तिन्ही दिवशी ही रुग्ण संख्या पुढे मुसंडी न मारता २० हजारांवर स्थिरावरली होती. तर रविवारी ही रुग्ण संख्या १९ हजार ४७४ एवढी होऊन खालच्या दिशेला हा आलेख सरकताना दिसला. परंतु सोमवारी हा आलेख तब्बल ६ हजारांनी खाली घसरला.

रविवारी जिथे १९ हजार ४७४ रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी ५९ हजार २६४ चाचण्या केल्यानंतर १३ हजार ६४८ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे पाचही रुग्ण दिर्घकालिन आजारी होते. यामध्ये ३ रुग्ण पुरुष आणि २ महिला रुग्णांचा समावेश होता. या पाचही रुग्णांचे ६० वर्षांवर होते.

( हेही वाचा : पोयसर नदी मलमुक्त करण्याचा खर्च ४०० कोटींनी वाढला )

दिवसभरात २७,२१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ७ हजार ४०८ रुग्ण उपचार घेत असून सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ०३ हजार ८६२एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा ३७ दिवस एवढा होता.

रविवारी सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या १७ एवढी होती, तर सोमवारी ही संख्या ३०एवढी होती, तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही वाढ होत १२३वरून १६८ एवढी झाली होती.

दिवसभरातील रुग्ण संख्या

एकूण बाधित रुग्ण : १३, ६४८
बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या: ११,३२८(८३ टक्के)
सोमवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण : ७९८
दाखल रुग्णांपैंकी ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या : ४६

एकूण दाखल रुग्ण : ७,४०८
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : १ लाख ०३ हजार ८६२

एकूण उपलब्ध रुग्ण खाटा :३५,२६६

रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : २१.०टक्के

बरे झालेले रुग्ण : २७,२१४
दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०४

दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ५९,२४२
कंटेन्मेंट झोपडपट्टी: ३०
सीलबंद इमारती : १६८

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.