आता आरबीआयच्या नावानेच ऑनलाईन घोटाळा!

पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेकद्वारे हा घोटाळा असल्याचे जाहीर करण्यात आले असून यापासून सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

‘डी मार्ट’ या सुपर मार्केटच्या नावाने नुकताच ऑनलाईन घोटाळा उघडकीस आला. तरीही असे घोटाळे कमी होताना दिसत नाही. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने नवा घोटाळा उघडकीस आला आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेकद्वारे हा घोटाळा असल्याचे सिद्ध करण्यात आले असून यापासून सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

काय आहे हा घोटाळा?

सध्या सोशल मीडियात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लेटर हेडवर आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र प्रसिद्ध होत आहे. ज्यामध्ये म्हटले आहे कि, रिझर्व्ह बँकेचा गणेश भूमजी यांच्याशी करार झाला आहे. त्यानुसार ग्राहकांनी १२ हजार ५०० रुपये ऑनलाईन द्वारे बँकेत जमा केले कि संबंधित बँकेचे व्यवस्थापक पुढील ३० मिनिटांत तुमच्या खात्यामध्ये ४ कोटी ६२ लाख जमा करतील, असे या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा : कोकणात जाताना टोल भरू नका, कारण…)

काय म्हटले पीआयबीने?

पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा घोटाळा असल्याचे सिद्ध झाले. अशा प्रकारे कोणतीही योजना रिझर्व्ह बँकेची नाही. तसेच ते पत्रही खोटे आहे, त्यामुळे या खोट्या योजनेला बळी पडू नका, असे आवाहन यात करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here