वरळीच्या टेकडीवरील उद्यान हिरवेगार राखण्यासाठी हात पडले तोकडे, म्हणून ‘यांची’ केली निवड

272

वरळी टेकडीवरील पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलाशया (टाकी) शेजारील लाल बहादुर शास्त्री उद्यान हिरवेगार राखण्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे हात तोकडे पडू लागले. आतापर्यंत महापालिकेच्या उद्यान कर्मचाऱ्यांमार्फत या उद्यानाची देखभाल केली जात होती, परंतु तब्बल ५८ वर्षे या उद्यानाची देखभाल राखणाऱ्या महापालिकेल्या माळी तथा श्रमिकांची संख्या कमी होऊ लागल्याने अखेर या उद्यानाच्या देखभालीकडेही उद्यानाच्या कंत्राटदाराचा शिरकाव होऊ लागला आहे.

वरळी टेकडी जलाशयातून वरळीतील जनतेला पाणी पुरवठा केला जात आहे. या जलाशयाच्या परिसरात लाल बहादूर शास्त्री उद्यान हे असून या उदयान १९६५ पासून अस्तित्वात आले. हे उद्यान जलअभियंता विभागाच्या अंतर्गत हे असल्याने उद्यान कर्मचाऱ्यांच्या मार्फतच १९६५ पासून ४३ माळी तथा श्रमिक तसेच हेडमाळी आदींच्या माध्यमातून या उद्यानाची देखभाल केली जात आहे. परंतु सन २०२०मध्ये या उद्यानाचे सुशोभिकरण उद्यान कक्षाच्या माध्यमातून केले आहे. या उद्यानातील बागकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने बनवण्यात आलेल्या या उद्यानात अनेक शोभेची झाडे, धबधबा आणि हिरवळ आदींची कामे केली आहे.

(हेही वाचा ‘तेजस’चे उतरले ‘तेज’; पैसे फुल, सुविधा गुल)

परंतु याच्या देखभालीसाठी यापूर्वी जलअभियंता विभागातील उद्यान कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३ पदांपैकी केवळ १६ कर्मचारी शिल्लक असल्याने यासर्वांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. सुमारे २१ हजार ८८५ चौरस मीटरच्या परिसराची साफसफाई करण्याचे काम या उद्यान विभागाच्या कामगारांकडून होत नसल्याने या उद्यानाच्या दैनंदिन देखभालीसाठी पुढील ३ वर्षांकरता कंत्राटदराची निवड करण्यात येत आहे. यासाठी यश ऋषभ ब्रदर्स कंपनीची निवड करण्यात आली असून या उद्यानाच्या देखभालीसाठी सुमारे ६७ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.