आता सुट्या सिगारेट मिळणार नाहीत; दारू विक्रीवरही येणार निर्बंध?

116

सुट्या सिगारेट विक्रीवर बंदी घालावी, अशी शिफारस संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारला केली आहे. एकावेळी केवळ एकच सिगारेट विकत घेणा-या ग्राहकांची मोठी संख्या असून, त्यामुळे सिगारेटचा एकूण खपदेखील अधिक आहे. त्यामुळे तंबाखू पदार्थांच्या नियंत्रणासाठी सुरु असलेल्या मोहिमेवर परिणाम होत आहे, असे समितीने म्हटले आहे.

तंबाखूजन्य उत्पादनांवरील कर वाढवण्याची, तसेच सर्व विमानतळांवरील स्मोकिंग झोन बंद करावे, अशी शिफारसही या समितीने केली आहे. समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जीएसटी लागू झाल्यानंतर तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांमध्ये फार वाढ झालेली नाही. या समितीने मद्याच्या विक्रीवरही आणखी काही निर्बंध लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे.

कॅन्सरची शक्यता

आगामी अर्थसंकल्पात तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, असे संसदीय समितीने इंटरनॅशनल एजन्सी फाॅर रिसर्च ऑन कॅन्सर या संघटनेच्या अहवालाचा हवाला देताना म्हटले आहे.

( हेही वाचा: विद्यार्थ्यांनो सावधान; CBSE 2023 परीक्षेचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे वेळापत्रक बनावट )

सुगंधीत तंबाखूवरही हवे अधिक निर्बंध

गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली विकल्या जाणा-या उत्पादनांवरदेखील अधिक निर्बंध लादणे आवश्यक आहे. तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांत वाढ झाल्यानंतर त्यांच्या विक्रीत घट होण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा परिणाम कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होण्यात झाला तर ते उत्तम होईल, असे कॅन्सर तज्ज्ञांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.