राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, तपासात मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. या हत्येसाठी बाबा सिद्दीकींच्या हल्लेखोरांना आगाऊ २ लाख ५० हजार रुपये रक्कम दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Baba Siddique)
त्याचबरोबर अनेक दिवसांपासून गोळीबार करणारे मारेकरी बाबा सिद्दीकी यांचे घर आणि त्यांच्या कार्यालयाचा शोध घेत होते, अशी गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी, एका शस्त्र विक्रेत्याने कुरिअर एजंटच्या (डिलिव्हरी मॅन) मदतीने हल्लेखोरांना बंदूक दिली होती. या बंदुकीसाठी आधीच पैसे दिले होते.
गोळीबार करणारे हल्लेखोर मुंबईतील कुर्ला परिसरात थांबले होते
चौकशीदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर आरोपी हे दीड महिन्यापूर्वीच मुंबईत आले होते आणि कुर्ला परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्लेखोरांनी याआधीही अनेकवेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा संधी मिळताच गोळीबार केला. (Baba Siddique)
(हेही वाचा – मविआ सरकार आल्यास ‘या’ योजना बंद होणार, Chandrasekhar Bawankule यांनी सांगितला ठाकरेंचा नवा प्लॅन)
दिल्ली पोलिसही मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याचे
हल्लेखोर गुरमेल बलजित सिंग आणि धर्मराज राजेश कश्यप यांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून अद्याप तिसरा आरोपी फरार आहे. तसेच या हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणातील गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप, दोघेही २३ आणि १९ वर्षांचे असून, सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत आणि त्यांना रविवार दुपारपर्यंत एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सिद्दीकीच्या हत्येमागील नेमका हेतू काय होता हे पोलीस अजूनही तपासत आहेत, आणि चौकशीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) च्या विवादाशी संभाव्य संबंध आहे, ज्यामध्ये सिद्दिकचा सहभाग होता. याव्यतिरिक्त, सिद्दिकीचे अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध पाहता, ज्याला यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने धमकावले होते, या हत्येमध्ये टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी दिल्ली पोलिसाचे स्पेशल सेलचे काउंटर इंटेलिजन्स युनिटही मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी ६ गोळ्या जप्त केल्या होत्या. बाबा सिद्दीकी यांना तीन गोळ्या लागल्या तर एक गोळी शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीच्या पायाला लागली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. सध्या या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community