चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गेले होते. आता कोकणकर पुन्हा मुंबईत परतत आहेत. यावेळी त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवासही त्रासदायक झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Mumbai Goa Highway)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील (Raigad District) माणगांव ते इंदापूर (Mangaon to Indapur Traffic) दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सव आटपून चाकरमानी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यातच जोडून सुट्टया आल्याने ही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. सरकारी बस, खाजगी कार आणि दुचाकी यासह विविध प्रकारच्या वाहतुकीच्या पद्धतींचा वापर करूनही, प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे प्रवास करणे कठीण होत आहे. वाहने गोगलगायीच्या वेगाने जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, प्रवाशांचा संताप वाढत आहे. (Mumbai Goa Highway)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या घरी आला खास पाहुणा; नामकरण सोहळाही झाला)
मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा विलंब आणि निराशा होत आहे. त्यात पावसामुळे रस्त्यांवर काही प्रमाणात चिखल साचला आहे. यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागत आहे. तसेच वाहतूक पोलीसही वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (Mumbai Goa Highway)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community