BMC : महापालिकेच्या तीन उपायुक्तांची खांदेपालट

गंगाथरण यांच्याकडून शिक्षण विभागाची जबाबदारी काढून घेताना दक्षता विभागाचा भार कायम ठेवला आहे.

7400
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च

मुंबई महापालिकेतील सहआयुक्त तसेच दोन उपायुक्तांकडील खात्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये सनदी अधिकारी असलेल्या सहआयुक्त डी. गंगाथरण यांच्याकडील शिक्षण विभागाचा भार काढून घेत या पदाची जबाबदारी उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडे सोपवली आहे. तर मागील अनेक महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापनाचा भार सांभाळणाऱ्या चंदा जाधव यांच्याकडील या पदाचा भार काढून घेत उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे चंदा जाधव यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार काढून घेण्यामागे नक्की दबाव कुणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

मुंबई महापालिकेचे (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची जबाबदारी आहे. शिवाय अतिक्रमण निर्मुलन(शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरे) या पदाची जबाबदारी होती. त्यातील अतिक्रमण निर्मुलन विभागाची जबाबदारी काढून पुन्हा सहआयुक्त गंगाथरण डी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गंगाथरण यांच्याकडून शिक्षण विभागाची जबाबदारी काढून घेताना दक्षता विभागाचा भार कायम ठेवला आहे. (BMC)

घनकचरा व्यवस्थापनाची मागील अनेक महिन्यांपासून जबाबदारी सांभाळणाऱ्या चंदा जाधव यांनी स्वच्छता मोहिमेसह स्वच्छतेबाबतच्या विविध उपक्रमांना गती देण्याचे काम केले आहे. चंदा जाधव या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार सक्षमपणे पेलत असतानाच अचानक बुधवारी १३ डिसेंबर रोजी त्यांच्याकडील या पदाचा भार काढून घेत त्यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवताना या पदाचा भार सह आयुक्त यांच्या कडून कमी केला आहे. (BMC)

(हेही वाचा – Sand Policy : वाळू धोरणात सुधारणा करणार; राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती)

अशाप्रकारे पदाचा भार सोपवला उपायुक्तांकडे

सहआयुक्त गंगाथरण : दक्षता विभाग, अतिक्रमण निर्मुलन विभाग

उपायुक्त संजोग कबरे : मुंबई सुशोभिकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन

उपायुक्त चंदा जाधव : शिक्षण विभाग (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.