‘द केरळ स्टोरी’ The Kerala Story हा बॉलिवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात इस्लामिक कट्टरपंथीयांचे सत्य समोर आणत, हिंदू मुलींना जाळ्यात अडकवण्यापासून ते त्यांचे धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार करण्यापर्यंतच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कट्टर इस्लामिक संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’चे पोस्टर फाडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ चेन्नईचा असून तो थिएटरच्या बाहेरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये काही लोक चित्रपटाचे पोस्टर फाडताना दिसत आहेत. व्हिडिओ पुढे जात असताना, काही लोक ‘नारा ए तकबीर – अल्लाह हू अकबर’ अशी इस्लामिक घोषणा देताना ऐकू येतात. इतकेच नाही तर व्हिडीओच्या शेवटी काही लोकांच्या हातात तामिळनाडू मुस्लिम मुन्नेत्र कळघम (TMMK) या इस्लामिक संघटनेचा झेंडा दिसत आहे. हा व्हिडीओ चेन्नईच्या कोणत्या भागातील आणि कोणत्या सिनेमा हॉलचा असला तरी त्याची पुष्टी होऊ शकली नाही.
(हेही वाचा The Kerala Story चित्रपटाबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?)
असे व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स विचारत आहेत की, हा चित्रपट ISIS वर बनवला आहे. इस्लाम आणि इसिसचा संबंध नसताना हे लोक का दुखावले जात आहेत.
An alleged Muslim Mob has attacked PVRs showing "The Kerala Story" in Chennai.
If there is no relation between Islam and ISIS then why are they offended? pic.twitter.com/Jw03xSjSnm
— kanishka 🇮🇳 (@KanishkaDadhich) May 5, 2023
त्याचप्रमाणे एकाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्येही तामिळनाडू मुस्लिम मुन्नेत्र कळघम (TMMK) या कट्टरवादी इस्लामिक संघटनेचे लोक हातात ‘द केरळ स्टोरी’चे पोस्टर फाडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील आहे.
Members of the Tamil Nadu Muslim Munnetra Kazhagam (#TMMK) staged a protest against the screening of the movie #TheKeralaStory in #Coimbatore on Friday. 📽: @peri_periasamy /@THChennai @the_hindu pic.twitter.com/lFuL4B4zJV
— Periasamy M (@peri_periasamy) May 5, 2023
कट्टरपंथी इस्लामिक संघटनांपासून ते डावे लोक ‘द केरळ स्टोरी’ला विरोध करत आहेत. या चित्रपटावर बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीमुळे उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल झाल्या आहेत. मात्र, दोन्ही न्यायालयांनी चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला.
सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ प्रमाणपत्र दिले
विशेष म्हणजे सेन्सॉर बोर्डाने काही बदलांसह द केरळ स्टोरी The Kerala Story रिलीजसाठी तयार केली आहे. एका दृश्यात हिंदू देवतांबद्दल (एका मुस्लिम पात्राची) टिप्पणी होती, जी काढून टाकण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्टांना दुटप्पीपणा दाखवणाऱ्या टिप्पणीतून ‘भारतीय’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदम यांची एक टीव्ही मुलाखत, ज्यांनी राज्य इस्लामिक राज्य बनण्याची भविष्यवाणी केली होती, ती काढून टाकण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने 10 सीन्स हटवून रिलीजसाठी मंजुरी दिली आहे. तसेच या चित्रपटाला ए प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community