Shivaji Park : छत्रपती शिवाजी महाराज उद्यानावरील धुळीच्या समस्येचे होणार निराकारण; खासदार शेवाळेंच्या पुढाकाराने निघाला उपाय 

मैदानात धूळ खेचून घेणारा ट्रक आणण्यात आला होता. त्याचा विशेष डेमोही करण्यात आला.

174

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (Shivaji Park) येथील अतिरिक्त माती आणि धुळीमुळे या परिसरातील नागरिकांना होणार त्रास आता लवकरच संपणार आहे. कारण शिवसेना लोकसभा गटनेते, खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या पाठपुराव्याने छत्रपती शिवाजी पार्क येथील धुळीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर पालिका प्रयत्न करत आहे. त्याचा एक भाग म्हणून गुरुवारी, ७ मार्च रोजी दुपारी महापालिकेच्या वतीने मैदानात (Shivaji Park) एक विशेष डेमो घेण्यात आला. या डेमोमध्ये मैदानातील हवेत उडणारी माती आणि धूळ व्हॅक्यूमच्या साहाय्याने ट्रकमध्ये जमा केली जाते. हा डेमो यशस्वी झाला असून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे.

(हेही वाचा Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले)

धूळ खेचून घेणारा ट्रक आणण्यात आला

दक्षिण मध्य मुंबईतला महत्वाचा विभाग असलेला दादरमधली छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (Shivaji Park) परिसर कोणत्या ना कोणत्या राजकीय, सामाजिक कारणांमुळे सतत चर्चेत असतो. पण याच मैदानातील धुळीच्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसानाच्या त्रासांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी मैदान समतल करून मैदानामध्ये मातीचा भराव टाकून त्यावर हिरवळ तयार करत धुळीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. पण त्याचा परिणाम एवढा दिसून आलेला नसल्याने स्थानिक तीव्र नाराज आहेत. आता शिवाजी पार्क (Shivaji Park) प्रदूषणमुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराने गुरुवारी, ७ मार्च रोजी मैदानात धूळ खेचून घेणारा ट्रक आणण्यात आला होता. त्याचा विशेष डेमोही करण्यात आला. त्यामध्ये मैदानात हवेत उडणारी माती आणि धूळ व्हॅक्यूमच्या साहाय्याने ट्रकमध्ये जमा केली जाते. हा डेमो यशस्वी झाला असून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.