मुंबईत रविवारी रात्री कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई शहरातील दादर टीटी, हिंदु कॉलनी, हिंदमाता, लालबाग, वरळी, परळ, शिवडी ते वडाळा येथून तर पूर्व उपनगरातील टागोर नगर विक्रोळी, साकीनाका, मुलुंड, भांडूप, विद्याविहार व पश्चिम उपनगरात दहिसर चेक नाका, अंधेरी, बांद्रा (प), विलेपार्ले, मालाड या भागातून पाणी साचण्याच्या घटना घडल्या. मुंबई शहर व उपनगरात रात्रौ ८ ते मध्यरात्री १ या दरम्यान झालेल्या जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टीमुळे व मध्यरात्री १:५५ वा. समुद्रास असणाऱ्या ३.७४ मीटर उंचीच्या भरतीमुळे हे पाणी साचले असले तरी पहिल्या पावसात रस्त्या लगतच्या गटारांच्या मुखांवर कचरा आणि माती जमा झाल्यामुळे हे पाणी तुंबलं जातं आणि हे प्रत्येक पहिल्या पावसात हेच चित्र दिसत आले आले. (Mumbai Rain)
मुंबईत रविवारी रात्री पासून सोमवार पर्यंत २४ तासात शहर भागात ५२.६ मिमी आणि उपनगरात ६८.०८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून या पहिल्याच पावसात विविध ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींवर तात्काळ संबंधित विभागामार्फत कार्यवाही करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. (Mumbai Rain)
(हेही वाचा – Uddhav Thackeray : विधानसभा समोर ठेवून कामाला लागा)
शॉर्टसर्किटच्या तब्बल ३६ घटना
शहरात २४, पूर्व उपनगरात ०६ व पश्चिम उपनगरात ०६ अशा एकूण ३६ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांद्वारे या तक्रारींचे निवारण करण्यात आले. (Mumbai Rain)
मुंबईत ५७ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या
मुंबईत या कालावधीत झाडे/फांद्या पडण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. यात शहरात १७, पूर्व उपनगरात ०७ व पश्चिम उपनगरात २७ अशा एकूण ५७ ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारी नागरीकांकडून प्राप्त झाल्या होत्या. संबंधीत विभाग आणि अग्निशमन दल यांच्या माध्यमातून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला. यात कोणालाही मार नाही. (Mumbai Rain)
मुंबईत सहा ठिकाणी पडल्या भिंती
मुंबईत मागील २४ दिवसांमध्ये, शहरात ०२, पूर्व उपनगरात ०२ व पश्चिम उपनगरात ०२ अशा एकूण ०६ ठिकाणी ठिकाणी घराचा तसेच भिंतींचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या आहेत. (Mumbai Rain)
विक्रोळीत इमारतीचा भाग पडला, दोघांचा मृत्यू
विक्रोळी (प), टाटा पावर, कैलास बिझनेस पार्कजवळ, तळमजला अधिक ०५ मजले या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्याचा लोखंडी सळी व सज्जाचा काही भाग पडून झालेल्या दुर्घटनेत दोन व्यक्ती जखमी झाल्या. या जखमींना उपचारार्थ राजावाडी रुग्णालयामध्ये पाठविले असता कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकारी डॉ. निवेदिता यांनी त्यांना मृत घोषित केले. नागेश रेड्डी, (३८ वर्षे) रोहित रेड्डी, (१० वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. (Mumbai Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community