अकरावी प्रवेशासाठी पसंतीचे महाविद्यालय निवडण्याची प्रक्रिया शुक्रवार २२ जुलैपासून सुरू होणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, औरंगाबाद शहरांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे होत आहे.
( हेही वाचा : परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरू)
महाविद्यालय निवडण्याची प्रक्रिया सुरू
दहावीचा निकाल लागून जवळपास महिना होऊन गेला तरी अकरावी प्रवेशासाठीचा दुसरा भाग कधी भरायचा या बद्दल विद्यार्थी संभ्रमात होते. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली नसल्याने प्रवेश प्रक्रियेला प्रचंड विलंब झाला होता. राज्य मंडळ वगळता इतर मंडळांच्या लांबलेल्या दहावीच्या निकालाचाही या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला होता. आता ही प्रतीक्षा संपली असून, येत्या शुक्रवारपासून विद्यार्थी पसंतीचे एक ते दहा महाविद्यालये निवडू शकतात. ज्या ग्रामीण भागात विद्यालय स्तरावर प्रवेश होतात. अशा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार आहे.