जून महिन्यापासून सुरू झालेला पावसाळा आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामधून पावसाने हा प्रवास सुरू केला आहे. आता हा प्रवास अवघा २ दिवसांपुरता उरलेला आहे. त्यानंतर हिवाळा सुरू होणार आहे.
यंदाच्या पावसाने जूनमध्ये इनिंग सुरू केली, मात्र जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पावसाळा मंदावला होता, परंतू सप्टेंबर महिन्यापासून पावसाने जोर धरला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात पूरपरिस्थितीने शेतकरी यांचे प्रचंड नुकसान केले. काही जिल्ह्यांत तर २-३ वेळा पूर आला.
या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
हवामान खात्याने आता पावसाने परतीचा प्रवास सुरू केला. पुढील दोन दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सातारा, सांगली कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे.
Status of Withdrawal of SW Monsoon as on 11 Oct today.
परतीच्या पावसाची राज्यामधून आज पासून सुरवात
पूर्व विदर्भाच्या काही भागातून pic.twitter.com/ee5gTmvZ04— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2021
झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडीशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधून पूर्णपणे मान्सून माघारी परतणार आहे. तर गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि ईशान्यकडील काही राज्यातील काही भागातून मान्सून माघारी जाणार आहे.
Join Our WhatsApp Community