राज्यतील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची, माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.
भरती प्रक्रिया तातडीने
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट- क संवर्गांपैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. 2019 च्या जाहिरातीनुसार, आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आतापर्यंत चार लाख अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
( हेही वाचा: “…कारण राज्यात नामर्दाचे सरकार, हेच का ते खरे हिंदुत्व?” औवेसीवरुन राणेंचा शिवसेनेला टोला )
पदसंख्या अशी…
आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकांची 47 पदे, औषध निर्मात्याची 324 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 96, आरोग्यसेवकाची 3 हजार 184 पदे आणि आरोग्यसेविकांची 6 हजार 476 पदे अशी एकूण 10 हजार 127 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community