झेडपी, आरोग्य विभागात 19 हजार पदे रिक्त; भरतीकडे तरुणांच्या नजरा

जिल्हा परिषदेतील 13 हजार आणि आरोग्य विभागातील 6 हजार, अशा 19 हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे. यामुळे या पदासाठी अर्ज भरुन ठेवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांनी या पदाकरता अर्ज केला आहे. त्यांना भरती प्रक्रिया सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारने ही भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.

आरोग्य विभागामध्ये 6 हजार पदांसाठी 2021 मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली. दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर, संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. या पदाकरता नव्याने प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसल्याचे, जाहीर करण्यात आले आहे. परंतु, भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होणार? हा उमेदवारांचा प्रश्न आहे.

( हेही वाचा: महागाईत जीएसटीची भर! काय स्वस्त, काय महाग? वाचा यादी )

13 हजार पदांकरता अर्ज प्रक्रिया

जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गातील 13 हजार पदांकरता अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली. परंतु या परीक्षेसाठी अर्ज दाखल करणा-या उमेदवारांना ना काॅल आले ना परीक्षा घेण्यात आली. तीन वर्षांचा कालावधी लोटूनही भरती होत नसल्याने, उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here