- ऋजुता लुकतुके
लाल समुद्रातून होणाऱ्या माल वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्यामुळे भारताचं येणाऱ्या दिवसांत ३० अब्ज अमेरिकन डॉलरचं नुकसान होऊ शकतं. येमेन आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हौती बंडखोरांनी इस्त्रायलच्या हमासवरील कारवाईच्या निषेधार्थ इस्त्रायलशी संबंधित जहाजांवर क्षेपणास्त्राचा मारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मालवाहतुकीवर त्याचा परिणाम होऊन समुद्रामार्गे होणाऱ्या वाहतुकीचा खर्च वाढला आहे. (Red Sea Crisis)
आणि खर्च वाढल्यामुळे निर्यातदार कंपन्यांनी निर्यात रोखून धरली आहे. आताच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दिल्लीतील एका संशोधन कंपनीने याचा भारतीय निर्यातीवर किती परिणाम होईल, याचा अंदाज बांधला. आणि त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत भारताची निर्यात ६ ते ७ टक्क्यांनी घटेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Red Sea Crisis)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी)
‘लाल समुद्रातील संकटामुळे भारताच्या व्यापारावर नक्कीच परिणाम होईल आणि तो आतापेक्षाही कमी होईल,’ असं थिंकटँक संस्थेचे प्रमुख सचिन चर्तुवेदी यांनी म्हटलं आहे. सरकारने अजूनही कुठलीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. पण, अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालानुसार, सुएझच्या कालव्यातून होणारा व्यापार ४४ टक्क्यांनी रोडावला आहे. मागच्या आठवडाभरात हौती बंडखोरांनी काही जहाजांवर क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. आणि इस्त्रायलशी संबंधित एकही जहाज इथून पार होऊ देणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. (Red Sea Crisis)
भारतासाठी बोलायचं झालं तर भारतीय माल युरोप, अमेरिकेचा पूर्व किनारा, दक्षिण अमेरिकन देश आणि मध्य-पूर्वेत पोहोचवण्यासाठी लाल समुद्र हा महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या आठवड्यात भारतीय नौदलाने सोमालिया जवळ एक जहाज समुद्री चाच्यांच्या तावडीतून सोडवलं. अशी संकटं पाहता भारतीय निर्यातदारांनी जवळ जवळ २५ टक्के निर्यात ही सध्या बंद केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट कंपनीजने हा अंदाज व्यक्त केला आहे. (Red Sea Crisis)
आणि येणाऱ्या दिवसांत कदाचित हे संकट वाढू शकतं. (Red Sea Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community