‘या’ बॅंकेवर RBI ने घातले निर्बंध; आता 15 हजार रुपयेच काढता येणार

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने मुंबईतील रायगड सहकारी बॅंकेवर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त 15 हजार रुपये काढता येणार आहेत. बॅंकेच्या रोख मुल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बॅंकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, रायगड बॅंकेवरील निर्बंध हे सहा महिन्यांसाठी असणार आहेत. बॅंकेतील बचत खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीदारांना 15 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नसल्याचे, रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. रायगड सहकारी बॅंकेवर निर्बंध लागू केले म्हणजे त्या बॅंकेची आर्थिक स्थिती निर्बंधासह बॅंकेला बॅंकिग व्यवसाय करता येऊ शकेल, असेही आरबीआयने म्हटले.

( हेही वाचा: सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनाला यश )

ठेवीदारांवर कोणताही परिणाम नाही 

RBI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, बॅंकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्बंधांच्या निर्देशात बदल होऊ शकतात. दरम्यान, आरबीआयने बीड येथील श्री. छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बॅंकेने फसवणूक- वर्गीकरण आणि अहवालाबाबतच्या नियमांचे उल्लघंन केल्याने ही दंडात्मक कारवाई केली गेली. या बॅंकेच्या ठेवीदारांवर आरबीआयच्या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here