Bank holidays June 2022 जून महिन्यात बॅंकेची काम उरकण्याचा विचार करत असाल, तर जून महिन्यामध्ये 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही पुढील महिन्यातील कामांसाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याआधी बॅंक सुट्ट्यांची यादी चेक करणे आवश्यक आहे. जून महिन्यातील बॅंक सुट्ट्यांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बॅंकेच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.
जून महिन्यामध्ये येणा-या काही सुट्ट्या, सण हे विशिष्ट राज्य अथवा प्रदेशाशी संबंधित असतात. म्हणून, बॅंकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्याचबरोबर, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, रविवार शिवाय महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद असतात.
( हेही वाचा: कोरोना संकटामुळे देशातील गरीब तब्बल 30 वर्षे गेलाय मागे; अहवालातील निष्कर्ष)
जून 2022 मधील बॅंक सुट्ट्यांची यादी
- 2 जून – महाराणा प्रताप जयंती/ तेलंगणाा स्थापना दिवस- हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा.
- 3 जून- श्री गुरु अर्जुन देवजी यांचा हुतात्मा दिवस-पंजाब.
- 5 जून ( रविवार)- साप्ताहिक सुट्टी.
- 11 जून (शनिवार)- दुसरा शनिवार बॅंक सुट्टी.
- 12 जून ( रविवार)- साप्ताहिक सुट्टी.
- 14 जून– पहिला राजा/ संत गुरु कबीर जयंती- ओडिसा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरणाया, पंजाब.
- 15 जून- राजा संक्रांती- वायएमए दिवस/ गुरु हरगोविंद यांचा जन्मदिवस- ओरिसा, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर.
- 19 जून (रविवार)- साप्ताहिक सुट्टी.
- 22 जून- खारची पूजा (त्रिपुरा).
- 25 जून (शनिवार)- चौथा शनिवार बॅंक सुट्टी.
- 26 जून ( रविवार) साप्ताहिक सुट्टी.
- 30 जून – रामना नी – मिझोराम.