आता स्पर्शाने कळणार, नोट दहाची की शंभरची ?

दृष्टिहीन व्यक्तींसाठी चलनी नोटांमध्ये स्पर्शिक वैशिष्ट्यांचा समावेश केला असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बॅंकेने उच्च न्यायालयात सोमवारी दिली. नवीन चलनी नोट व नाणी दृष्टिहीन व्यक्तींना ओळखताना कठीण जात असल्यासंदर्भातील तक्रार नॅशनल असोसिएशन फाॅर ब्लाइंडने जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्यायमू्र्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.

याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले की, यापूर्वीच्या चलनी नोटा व नाणी वेगवेगळ्या आकारात होती. त्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना त्या सहजपणे ओळखता येत होत्या. ही याचिका दाखल केल्यानंतर, आरबीआयने एक अॅप विकसित केले, ते अॅप दृष्टिहीन व्यक्ती वापरु शकतात ,असे वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले. अॅप विकसित करण्याशिवाय आरबीआयने दृष्टिहीनांसाठी काम करणा-या अनेक संस्थांशी दृष्टिहीनांसाठी चलनी नोटांमध्ये अनेक स्पर्शिक वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.

( हेही वाचा: “साहेब जैसा बोले तैसा चाले,म्हणून यांचे अस्तित्व बुडाले”; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका )

दृष्टिहीनांसाठी नोटांची रचना अशी

  • 100 च्या नोटेवर त्रिकोण आहे आणि चार रेषा आहेत, तर 500 च्या नोटेवर वर्तुळ आहे आणि पाच रेषा आहेत, तर 2000 च्या नोटेवर आयत आहेत, अशी माहिती आरबीआयच्यावतीने ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला दिली.
  • याचिकेद्वारे गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे याचिकार्त्यांनी आणखी काही सूचना करायच्या असल्यास अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे न्यायालयाने म्हटले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here